Home शहरं मुंबई mumbai news News : निर्णय प्रक्रियेत हवे काँग्रेसला स्थान - congress should...

mumbai news News : निर्णय प्रक्रियेत हवे काँग्रेसला स्थान – congress should have a place in the decision making process


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही असलो, तरी काँग्रेस पक्षाच्या काही मागण्या आहेत. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून काँग्रेसच्या मंत्र्यांचे याबाबतचे म्हणणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यात येईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी सांगितले. तथापि, काँग्रेस मंत्र्यांच्या नाराजीमागे राज्यपालनियुक्त आमदारकीच्या वाटप सूत्राचा प्रश्न असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांकडून समजते.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यपाल नियुक्त करावयाच्या १२ जागांमध्ये तीनही पक्षांना समसमान जागा मिळत नसल्यामुळे नाराजी प्रकट करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी गुरुवारी बैठक घेतली. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थानी काँग्रेस मंत्र्यांची बैठक पार पडली.

या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या प्रमाणे स्वतः शरद पवार कायम मंत्र्यांशी संवाद ठेवतात व सुसूत्रपणे राष्ट्रवादी सरकारमध्ये आपले म्हणणे रेटते, त्याची काँग्रेस पक्षात कमतरता असल्याचा मुद्दा चर्चिला गेला. या चर्चेअंती, आता प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांची एक बैठक होऊन त्यात कोणते विषय उपस्थित करायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरले. तसेच पक्षाची भूमिका ही बाळासाहेब थोरात मांडतील व एखादा महत्त्वाचा विषय असल्यास हायकमांडशी बोलून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, आघाडी सरकारमध्ये काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला बरोबरीचे स्थान मिळायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आमच्या मंत्र्यांची नाराजी मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटून त्यांच्या कानावर घालणार आहोत.

महाविकास आघाडीचे सरकार चालवताना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नाही, असे काँग्रेसच्या काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. करोनाच्या संकटात घेण्यात येणारे निर्णय तिन्ही पक्षांची चर्चा करून घेणे काँग्रेसला अपेक्षित आहे. सध्याच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे, त्यामुळे निर्णयांमध्ये सहभागी नसल्याची काँग्रेसची धारणा झाली आहे.

काँग्रेसला हव्या पाच जागा

राज्यपाल नामनियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांमध्ये अधिकची एक म्हणजे पाच जागा काँग्रेसला हव्या आहेत. मात्र, सध्याच्या सूत्रानुसार शिवसेनेला ५, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ आणि काँग्रेसला ३ जागा निश्चित केल्या आहेत. याची माहिती कळताच काँग्रेस नेत्यात नाराजी पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांची बैठक झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

burglary cases in mumbai: मुंबईत वाढल्या घरफोड्या – burglary cases have increased in mumbai after lockdown

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई करोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नियंत्रणात असलेल्या मुंबईतील चोऱ्या आणि घरफोड्या पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. लॉकडाउन असल्याने...

Recent Comments