Home शहरं मुंबई mumbai news News : पालघर पोलिस अधीक्षकांची बदली - palghar superintendent of...

mumbai news News : पालघर पोलिस अधीक्षकांची बदली – palghar superintendent of police transferred


पालघर अनुभवी पोलीस अधिकारी दत्तात्रय शिंदे यांच्या अखत्यारित

म. टा. विशेष प्रतिनिधी

पालघरमधील झुंडबळीच्या घटनेनंतर सक्तीच्या रजेवर पाठवलेले जिल्हा पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांची शनिवारी अखेर बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंह यांची मात्र अद्याप कोठेही नियुक्ती दाखवलेली नाही.

पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात १६ एप्रिल रोजी रात्री जमावाच्या हल्ल्यात दोन साधू व त्यांच्यासोबत असलेल्या वाहनचालकाला प्राण गमवावे लागले होते. चोर समजून गावकऱ्यांनी या तिघांवर हल्ला केला होता. या प्रकरणी राज्य सरकारने संबंधित हल्लेखोर तसेच पोलिसांवरही कारवाईचा बडगा उगारला होता.

पालघर जिल्ह्याचे पोलिस प्रमुख म्हणून स्थिती योग्यरितीने हाताळण्यात अपयशी ठरल्याने सिंह यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशाने सक्तीच्या रजेवर धाडण्यात आले होते. या पदाचा तात्पुरता कार्यभार उपजिल्हा पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे देण्यात आला होता. गौरव सिंह हे रजेवर असतानाच शनिवारी त्यांची पालघरमधून उचलबांगडी करण्यात असून याबाबतचा आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढला आहे. सिंह यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नसून ते बदलीच्या प्रतीक्षेत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पतसंस्थांच्या ठेवी होणार सुरक्षित

म. टा. खास प्रतिनिधी, नागरी सहकारी बँकांच्या ठेवींसाठी ज्याप्रमाणे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (डीआयजीसी) विमा संरक्षण प्राप्त असते त्याचप्रमाणे आता पतसंस्थांतील...

BJP: औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप सर्व जागा लढणार – bjp will contest all seats of aurangabad municipal corporation election

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद महापालिकासाठी भाजपने कंबर कसली असून, तयारीसाठी शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली. महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढण्याचा...

Virender Sehwag Make Comment On Fast Bowler Mohammed Siraj – IND vs AUS : मोहम्मद सिराजवर वीरेंद्र सेहवागने केली खास टिप्पणी, ट्विट झाले व्हायरल...

ब्रिस्बेन, IND vs AUS : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आजचा चौथा दिवस चांगलाच गाजवला. सिराजने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडेच...

Natasa Stankovic Shares Emotional Post For Hardik Pandya Father – ‘आपलं घर शांत झालं,’ सासऱ्यांच्या निधनावर नताशा स्टॅनकोविकने शेअर केली भावुक पोस्ट | Maharashtra...

मुंबई- क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याचे वडील हिमांशू पांड्या यांचं नुकतच निधन झालं. हिमांशू यांची सून आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आपल्या सासऱ्यांच्या आठवणीत अनेक...

Recent Comments