Home शहरं मुंबई mumbai news News : पालिका, परिवहन कर्मचाऱ्यांना आजपासून लोकल प्रवास शक्य -...

mumbai news News : पालिका, परिवहन कर्मचाऱ्यांना आजपासून लोकल प्रवास शक्य – municipal, transport employees will be able to travel local from today


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

सद्यस्थितीत अनेक बँकांचे व्यवहार सुरू झाले आहेत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना देखील लोकलमधून प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र बँकेतील कर्मचाऱ्यांच्या लोकलप्रवासाबाबत राज्य सरकारकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील अर्थचक्र सुरू झाल्याने अनेकांच्या हाताला काम मिळत आहे. लॉकडाउनमुळे घरात बसलेला नोकरदार वर्गही कार्यालयात रुजू होत आहे. या नोकरदार वर्गाचा प्रवास सुसह्य करण्यासाठी सरकारने परवानगीचा विस्तार केला आहे. यामुळे आज, शनिवारपासून मुंबई महानगर प्रदेशमधील सर्व महापालिका कर्मचारी, परिवहन संस्था आणि खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना लोकलप्रवास करणे शक्य होणार आहे.

सवलतीसह सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचे दर वाढत असल्याने नोकरदार वर्गाच्या चिंतेत भर पडत आहे. त्यातच दिवसभर कार्यालयात काम केल्यानंतर गाडी चालवण्यासाठी अंगात त्राण उरत नाही. दुसरीकडे दोन ते तीन तास एसटी, बेस्ट बसमधील प्रवासही नकोसा झाल्याने कर्मचाऱ्यांनी लोकलने प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली होती.

लोकलप्रवास परवानगीबाबत राज्य सरकारने सुधारित सूचना केल्या आहेत. ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येईल. योग्य तिकीट किंवा पास घेऊन प्रवास करता येईल. तूर्तास लोकल फेऱ्या पुरेशा असून परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जे. व्ही. एल. सत्यकुमार यांनी सांगितले.

एमएमआरमधील सर्व महापालिका, महापालिका शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. बेस्ट-एसटी कर्मचाऱ्यांसह एमएमआरमधील सर्व परिवहन संस्थेतील कर्मचाऱ्यांना देखील लोकलमधून प्रवास करता येईल. खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना लोकलप्रवासाची मुभा देण्यात आली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने परवानगी दिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची अनुमती देण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

लोकलप्रवास मुभा यांना

– सर्व रेल्वे, आयआरसीटीसी, एमआरव्हीसी कर्मचारी

– मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी

– सर्व महापालिका कर्मचारी (मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, मिरा-भाईंदर, पालघर)

– पालिका शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी

– परिवहन सेवेतील कर्मचारी (एसटी, बेस्ट, टीएमटी, केडीएमटी, एमबीएमटी)

– सरकारी-खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांसह पॅथॉलॉजी केंद्रातील कर्मचारी

‘क्यू आर’ पासची प्रतीक्षा

राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यू-आर कोड असलेला पास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्याप पास मिळाला नसल्याने करोना योद्धा असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचारी-पोलिस यांची प्रतीक्षा कायम आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pakistan in fatf grey list: Pakistan पाकिस्तानला झटका; FATFच्या करड्या यादीत कायम – pakistan to remain on fatf grey list on terror financing

पॅरिस/इस्लामाबाद: 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी धडपड करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे. पॅरिसमध्ये झालेल्या 'एफएटीएफ'च्या ऑनलाइन...

power outage problem in nashik: सण आला दारी, वीज नाही घरी – nashik niphad people facing power outage problem from last 8 days

म. टा. वृत्तसेवा, निफाड घरोघरी नवरात्रोत्सवाची पूजा, रविवारी दसरा आणि पुढे दिवाळी असे सणवाराचे दिवस असतानाही महावितरणच्या ढिसाळ कारभाराने शहरवासीयांना नैराश्याच्या अंधारात दिवस...

Lok Sabha panel: अॅमेझॉनची बेपर्वाई; कठोर कारवाईचा समितीचा इशारा – data protection bill : amazon refuses to meet lok sabha panel

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीवैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक विचाराधीन असलेल्या संयुक्त संसदीय समितीसमोर उपस्थित राहण्यास अमेझॉनने नकार दिला आहे. समितीने अमेझॉनचा हा...

Recent Comments