Home शहरं मुंबई mumbai news News : पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत आज बैठक - meeting today...

mumbai news News : पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत आज बैठक – meeting today regarding the working of the rainy season convention


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्य विधिमंडळाच्या मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजाबाबत निर्णय घेण्यासाठी आज, सोमवारी दुपारी उभय सभागृहांतील कामकाज सल्लगार समितीची बैठक विधानभवनात बोलावण्यात आली आहे. त्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चौथ्या लॉकडाउनची मुदत ३१ मेपर्यंत असल्यामुळे, आगामी पावसाळी अधिवेशन नियोजित २२ जूनपासून घ्यायचे की लांबणीवर टाकायचे याचा निर्णय अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेवर निवड झालेल्या नऊ आमदारांचा शपथविधी आज, सोमवारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान भवनात आगमन होईल. दुपारी एकच्या सुमारास मध्यवर्ती सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर उभय सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत याआधी जाहीर झालेल्या मुंबईतील २२ जूनपासून सुरू होणाऱ्या तीन आठवड्याच्या पावसाळी अधिवेशनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आज, सोमवारी दु. १.४५ वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची (विधानसभा आणि विधान परिषद) बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. करोना प्रादुर्भावामुळे राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन नियोजित तारखेप्रमाणे घ्यायचे की काही काळ पुढे ढकलायचे याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार विराजमान झाल्यानंतर मुंबईतील हे दुसरे अधिवेशन आहे. गेल्या मार्च महिन्यातील राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन करोना संसर्गामुळे एक आठवडा आधी गुंडाळावे लागले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bike-truck accident in nashik: साक्री-शिर्डी मार्गावर अपघातांची मालिका – two wheeler bike rider died in road accident in nashik

म. टा. वृत्तसेवा, सटाणासाक्री-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर-दुचाकी मोटारसायकलचा समोरासमोर अपघात होवून दुचाकी चालक समीर पप्पू...

health workers in nashik: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा टक्का वाढणार – nashik local health system has decided to increase corona vaccination for heath workers

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण ११ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करवून घेण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे...

Recent Comments