Home शहरं मुंबई mumbai news News : ‘पॉझिटिव्ह’ कैद्यांची यादी द्या - give a list...

mumbai news News : ‘पॉझिटिव्ह’ कैद्यांची यादी द्या – give a list of ‘positive’ prisoners


उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘तुरुंगांमधील कैद्यांना करोनाचा संसर्ग होऊ लागला असतानाच याविषयी त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती देणे टाळले जात आहे. त्यामुळे कैद्यांचे कुटुंबीय धास्तावले आहेत. करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांविषयी आणि संसर्गाचा धोका असलेल्या कैद्यांविषयी कोणती काळजी घेतली जात आहे, हेही कळायला मार्ग नाही’, असे निदर्शनास आणणाऱ्या अनेक जनहित याचिका आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत, करोना पॉझिटिव्ह कैद्यांची नावे व अन्य तपशील २५ मेपर्यंत सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले. त्याचबरोबर कैद्यांविषयी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर तपशीलवार प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले.

‘पीपल्स युनियन सिव्हिल लिबर्टीज’ या संस्थेने अॅड. कृतिका अगरवाल यांच्यामार्फत, गीता जैन यांनी अॅड. सनी पुनमिया यांच्यामार्फत तर अर्चना रुपवते यांनी अॅड. आफरीन खान यांच्यामार्फत याप्रश्नी जनहित याचिका केल्या आहेत. याविषयी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

‘आर्थर रोड तुरुंगातील अनेक कैदी व कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला असून भायखळा महिला तुरुंग आणि सातारामधील तुरुंगातही करोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यातील बहुतांश तुरुंगांमध्ये कैद्यांची गर्दी आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने कुटुंबीय धास्तावले आहेत. तुरुंगातील आपल्या निकटवर्तीयाच्या प्रकृतीची माहिती मिळण्याविषयी त्यांना सध्या कोणताही मार्ग नाही. त्यामुळे कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याशी एकदा आणि वकिलाशी एकदा, असे दोनदा संपर्क साधता यावा, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत. त्याचबरोबर कैद्यांना हँड सॅनिटायझर, साबण, एन-९५ मास्क इत्यादी पुरवण्याचे निर्देश द्यावेत. सध्या कुटुंबियांकडून मनीऑर्डर पोचणे शक्य नसल्याने गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास कैदी व कच्च्या कैद्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे निर्देशही सरकारला द्यावेत. त्याचबरोबर करोना संदर्भात कैद्यांचीही आरोग्य तपासणी व अन्य उपाय करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत’, अशी विनंती पीपल्स युनियनने याचिकेत केली आहे. अन्य याचिकादारांनीही कैद्यांच्या संदर्भात अनेक मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे सर्व मुद्द्यांविषयी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

padma awards 2021: पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील ६ जणांचा गौरव, सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणेंचा समावेश – padma awards 2021 sindhutai sapkal and girish...

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश...

bike-truck accident in nashik: साक्री-शिर्डी मार्गावर अपघातांची मालिका – two wheeler bike rider died in road accident in nashik

म. टा. वृत्तसेवा, सटाणासाक्री-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर-दुचाकी मोटारसायकलचा समोरासमोर अपघात होवून दुचाकी चालक समीर पप्पू...

Recent Comments