Home शहरं मुंबई mumbai news News: पोलिसांसाठी पाच रुग्णालये - five hospitals for police

mumbai news News: पोलिसांसाठी पाच रुग्णालये – five hospitals for police


याचा त्रास…

पोलिसांना करोनाचा संसर्ग झाल्यास त्यांना दाखल करून घेण्यास रुग्णालयांकडून नकार

मार्ग मोकळा

पोलिसांसाठीच्या कुटुंब आरोग्य योजनेत करोनाचा समावेश केल्याने तातडीने उपचार शक्य

या रुग्णालयांचा समावेश

बॉम्बे रुग्णालय, फोर्टिस रुग्णालय, रहेजा रुग्णालय, सेव्हन हिल्स रुग्णालय, हिरानंदानी रुग्णालय

पोलिसांना पाच रूग्णालयांचा आधार

निर्णय

या रुग्णालयांत

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पोलिस दलात करोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पोलिस दलाच्या स्पष्ट सूचना असूनही लागण होणाऱ्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे अखेर करोनाचा समावेश पोलिसांच्या कुटुंब आरोग्य योजनेत करण्यात आला असून, या अंतर्गत मुंबईतील पाच मोठ्या रुग्णालयात पोलिसांवर उपचार करण्यात येणार आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये नियम मोडणाऱ्यांची संख्याही त्याचा पटीने वाढतेय. लॉकडाउन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडू नका, अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या वाहनांमधून लोकांची ने-आण करू नका, अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. हे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस ऑनड्युटी आहेत. नाकाबंदी, गस्त यामुळे नागरिकांशी संपर्क येत असल्याने मुंबई पोलिस दलातही करोनाचा शिरकाव झाला आहे. मुंबई पोलिस दलात आत्तापर्यंत ५४ पोलिसांना करोनाची लागण झाली. सुमारे एक हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांचे कुटुंबीयही चिंतेत आहेत. एकापाठोपाठ एक पोलिस पॉझिटिव्ह येत असताना रुग्णालये मात्र त्यांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. संरक्षण आणि सुरक्षा विभाग, कुर्ला वाहतूक पोलिस तसेच पवईतील पोलिसांच्या बाबतीत असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे अखेरीस भविष्यात कुणाही पोलिसाची अडवणूक होऊ नये यासाठी आरोग्य योजनेतील वर्गवारीत या आजाराचा समावेश करण्यात आला आहे.

‘फुफ्फुसाचा आजार’ प्रकारात नोंद

पोलिस असतानाही रुग्णालयांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याने या घटनांची गंभीर दखल घेत पोलिस कुटुंब आरोग्य योजनेतील ‘फुफ्फुसाचा आजार’ प्रकारात करोनाचा समावेश करण्यात आला. या आरोग्य योजनेत येत असलेल्या रुग्णलयांपैकी बॉम्बे रुग्णालय, फोर्टिस रुग्णालय, रहेजा रुग्णालय, सेव्हन हिल्स रुग्णालय आणि हिरानंदानी रुग्णालय या पाच ठिकाणी करोनाबाधित पोलिसांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

America: आवश्यक दिलासा – green card eligibility categories and indian citizens

अमेरिकेत अनेक वर्षे राहून काम करणाऱ्या हजारो भारतीयांना, त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आणि अतिशय आवश्यक असणारा दिलासा अमेरिकी सिनेटने दिला आहे.  Source link

ranjitsinh disale: रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन – cm uddhav thackeray congratulates global teacher winner ranjitsinh disale

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

Recent Comments