Home शहरं मुंबई mumbai news News : बीकेसीत आणखी एक रुग्णालय! - another hospital in...

mumbai news News : बीकेसीत आणखी एक रुग्णालय! – another hospital in bk!


एमएमआरडीएकडेच जबाबदारी

विक्रमी वेळात पूर्ण केले जाणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यू होणाऱ्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्याही अधिक आहे. आतापर्यंत केवळ मुंबईतच ८००हून अधिक जणांना करोना विषाणूच्या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या खांद्याला खांदा लावत एमएमआरडीए प्रशासन देखील या लढ्यात उतरले. पहिल्या टप्प्यात एमएमआरडीएने बीकेसी येथे विलगीकरण केंद्र उभारले असून आता दुसऱ्या टप्प्यातील कोविड-१९ रुग्णालयाच्या प्राथमिक कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

सदर रुग्णालय पहिल्या टप्प्यातील विलगीकरण केंद्राला जोडूनच असलेल्या खुल्या मैदानावर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या काही ठिकाणी जमिनीच्या खाली तर काही ठिकाणी जमिनीला समांतर सांडपाण्याच्या वाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर तत्काळ मुख्य उभारणीचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. या रुग्णालयामध्ये देखील एक हजार खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून यापैकी १०० खाटा आयसीयूची व्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. तर उर्वरित ९०० खाटा या ऑक्सिजन आणि नॉन ऑक्सिजन अशा पद्धतीने राखीव असतील. हे रुग्णालय केवळ गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरात आणले जाईल असे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील रुग्णालय यापूर्वीच महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले असून हे रुग्णालय देखील विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे ध्येय एमएमआरडीएने ठेवले आहे. या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव स्वतः जातीने लक्ष

देत आहेत.

———–

पावसाळ्यासाठी सज्ज

अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए उभारत असलेले विलगीकरण केंद्र तसेच रुग्णालय पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित राहील का, याबाबत विचारणा केली जात होती. मात्र दोन्ही इमारती केवळ पावसाळ्यापासूनच नाहीतर आगीपासून देखील सुरक्षित राहतील, अशी रचना तयार करण्यात आली आहे. बीकेसी परिसरात फारसे पाणी साचत नसले तरी, उपाययोजना म्हणून दोन्ही इमारतींचे बांधकाम जमिनीपासून एक फूट उंचीवर उचलण्यात आले आहे. तसेच सांडपाणी किंवा साचलेले पाणी वाहून नेण्यासाठी जमिनीला समांतर अशी पाइपची जोडणी करण्यात आली आहे. इमारतींच्या दुतर्फा टिकाऊ स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच आगीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात आगप्रतिबंधक यंत्र बसवण्यात आले आहे. व सर्व वॉर्डांचे नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sameer Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी – mumbai drug case minister nawab malik son in law sameer...

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांना ड्रग्ज प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली...

इच्छूक उमेदवारांकडून भूखंडांचा गैरवापर

म. टा. वृत्तसेवा, निवडणुकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमदेवारांकडून मतदारांना खूश करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या...

पतसंस्थांच्या ठेवी होणार सुरक्षित

म. टा. खास प्रतिनिधी, नागरी सहकारी बँकांच्या ठेवींसाठी ज्याप्रमाणे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (डीआयजीसी) विमा संरक्षण प्राप्त असते त्याचप्रमाणे आता पतसंस्थांतील...

BJP: औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप सर्व जागा लढणार – bjp will contest all seats of aurangabad municipal corporation election

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद महापालिकासाठी भाजपने कंबर कसली असून, तयारीसाठी शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली. महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढण्याचा...

Recent Comments