Home महाराष्ट्र mumbai news News : बेस्टची आंदोलनाची घंटी; अत्यावश्यक सेवेवर परिणाम - best...

mumbai news News : बेस्टची आंदोलनाची घंटी; अत्यावश्यक सेवेवर परिणाम – best union threatens ‘stay home’ stir from monday over safety issue


– अत्यावश्यक सेवेवर परिणाम

– सेवा चालविण्यावर बेस्ट प्रशासन ठाम

– पर्यायी व्यवस्थेचा दावा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

बेस्टमधील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच, अपुऱ्या सोयीसुविधांच्या निषेधार्थ बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने पुकारलेले आंदोलन सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच समितीतर्फे कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास ‘घरी राहा, सुरक्षित राहा’, असे लॉकडाउनचे आवाहन करणाऱ्या आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर बेस्ट प्रशासनाने रविवारी रात्री बेस्ट कामगार संघटनांशी उशिरापर्यंत कोणतीही चर्चा केली नाही. तसेच, कामगार आंदोलनात सहभागी झाले, तरी एसटीच्या पर्यायी बससेवेने सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा केला जात आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत आंदोलनासंदर्भात कोणताही तोडगा निघालेला नव्हता.

अत्यावश्यक सेवेशी निगडित असलेल्या बेस्ट सेवेतील कामगारांमध्ये करोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. करोनाने बाधित झालेल्या आठ कामगारांचा मृत्यू ओढवला असून, करोनाग्रस्त कामगारांची संख्या १२२ इतकी झाली आहे. करोनाशी लढताना बेस्ट कामगार अग्रभागी असतानाही त्यांना सुविधा पुरविल्या जात नसल्याची भूमिका घेत कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यावर प्रशासनाकडून चर्चेचे पाऊल न उचलता सुमारे एक हजार एसटीची पर्यायी व्यवस्था करण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे समजते.

सध्या बेस्टसेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठी सुरू असल्याने दैनंदिन स्तरावर सरासरी १,५०० पर्यंत बस चालविल्या जातात. त्यासाठी तीन ते साडेतीन हजार चालक, वाहक कामावर येतात. या कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत कृती समितीने आंदोलन जाहीर केले. या आंदोलनात कामगार सहभागी होणार असल्याचे कृती समितीचे नेते शशांक राव यांनी नमूद केले आहे.

त्याचवेळी, बेस्ट कामगारांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यातील असलेल्या कमतरता भरून काढण्याचे प्रयत्न सुरू असून, करोनाशी लढत असताना आंदोलनासारखे पाऊल उचलू नये, असे आवाहन बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, कार्याध्यक्ष अॅड. उदय आंबोणकर यांनी केले आहे.

बेस्ट प्रशासन ठाम

बेस्ट सेवेवर आंदोलनाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. त्यासाठी कामगारांची नेमणूक, बससेवा सुरू ठेवण्याची तजवीज सुरू असून, एसटीच्या सुमारे एक हजार बसचीही तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनीही पत्रकाद्वारे बेस्टची सेवा सुरू राहणार असल्याचे नमूद केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सासऱ्याचे अतिक्रमण; सुनेचे सदस्यत्व बाद

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड सासरे दिलीप जाधव यांनी केल्याचे सिद्ध झाल्याने मधील तरतुदींनुसार एकलहरे ग्रामपंचायतीच्या यांना सभासदत्व अपात्र ठरविण्यात आले आहे....

जाता जाता : या, बसा डोक्यावर…

परवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या नवऱ्याला डोक्यावर घेऊन निघालेल्या एक उत्साही वैनी बघितल्या आणि जीव धन्य जाहला... हल्ली व्हॉट्सअप विद्यापीठामुळं जगभरातल्या अशा मनमौजेच्या...

Recent Comments