Home शहरं मुंबई mumbai news News : महत्त्वाच्या म्हाडा प्रकल्पांना परवानगी - permission for important...

mumbai news News : महत्त्वाच्या म्हाडा प्रकल्पांना परवानगी – permission for important mhada projects


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने महत्त्वाच्या, पायाभूत कामांना परवानगी देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. करोनाने बांधकामक्षेत्रही झाकोळले असले तरीही पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन स्थिती येऊ नये म्हणून म्हाडाच्या मुंबई मंडळाने काही कामांना परवानगी दिली आहे. त्यात ३३ (५) अंतर्गत पुनर्विकासाची संमती मिळालेल्या प्रकल्पांची कामे हाती घेतल्याचे म्हाडाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकारे सुमारे ३५ प्रकल्पांना यापूर्वीच परवानगी मिळाली असून तिथे कामे हाती घेण्यात आली आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळांतर्गत शहरात ५६ वसाहती असून त्यातील बहुतांश ठिकाणी पुनर्विकासाची निकड आहे. त्यासाठी उत्सुक असलेल्या गृहनिर्माण संस्थांकडून प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी म्हाडाकडे अर्ज येत असतात. मात्र, बांधकाम क्षेत्राला मंदीची झळ बसल्याने अनेक प्रकल्प कागदावरच राहिले आहेत. त्यात करोनाची भर पडली आहे. असे असले तरीही आतापर्यंत ज्या पुनर्विकास प्रकल्पांना परवानगी मिळाली आहे, तिथली महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऐन पावसाळ्यात अर्धवट राहिलेल्या कामांमुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची भीती असते. या प्रकल्पांच्या पायाभूत-प्राथमिक कामांचा अंदाज घेत कामे सुरू झाली आहेत. बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून रोगराई होण्याची भीती आहे. या अडचणी लक्षात घेऊन मुंबई मंडळाने त्या कामांसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही परवानगी देण्यासाठीही ऑनलाइनचा आधार घेण्यात आला आहे.

आरोग्याचा विचार करूनच निर्णय

या प्रकल्पांतील काही ठिकाणी संरक्षक भिंती नाहीत, बांधकामाचे साहित्य उघड्यावर पडून आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन म्हाडाने विकासक, कंत्राटदारांना परवानगी दिली आहे. त्यासाठी तिथल्या स्थानिकांसह कामगारांच्याही आरोग्याचा विचार करण्यात आला आहे. ही परवानगी देताना १३ अटींचे पालन करण्याचे बंधन विकासक, कंत्राटदारांवर ठेवण्यात आले आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाईचीही तरतूद आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kedar Jadhav: IPL 2021: मराठमोळ्या केदार जाधवचं काय झालं; चेन्नईने दिली संधी की डच्चू, पाहा… – ipl 2021: chennai super kings team release kedar...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुढच्या वर्षीच्या आयपीएलची जोरदार तयारी आता करत आहे. चेन्नईने हरभजन सिंग, पीयुष चावला...

yami gautam career: सिनेसृष्टीतील करिअरला ११ वर्षे पूर्ण; यामी गौतमनं शेअर केली खास पोस्ट – yami gautam shares pic from jaisalmer where she shot...

मुंबई: ‘काबिल’, ‘उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ असे हिट चित्रपट देणारी अभिनेत्री यामी गौतम सध्या राजस्थानात जैसलमेर इथं तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करतेय....

Recent Comments