Home शहरं मुंबई mumbai news News : मुंबईतील प्रसूतीगृहांची यादी सादर करा - submit a...

mumbai news News : मुंबईतील प्रसूतीगृहांची यादी सादर करा – submit a list of maternity hospitals in mumbai


उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत सध्याच्या करोना संकटकाळात गर्भवतींची प्रसूती करण्याच्या दृष्टीने कोणकोणती रुग्णालये, प्रसूतीगृहे व दवाखाने उपलब्ध आहेत, त्यांची यादी सादर करावी. त्याचबरोबर मागील दोन आठवड्यांत अशा ठिकाणांवर किती प्रसूती झाल्याची त्याची आकडेवारीही सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

‘नागपाडामधील एका गर्भवतीला २७ एप्रिल रोजी करोना निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करता न आल्याने जे. जे. रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर तिला आणखी तीन रुग्णालयांतही प्रवेश मिळू शकला नाही. अखेर एका रुग्णालयाबाहेर भेटलेल्या सुईणच्या मदतीने तिने स्वत:च्या घरातच प्रसूती करून घेतली’, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याआधारे अॅड. मोहिउद्दीन वैद यांनी तातडीची जनहित याचिका केली. याविषयी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणी झाली.

‘२७ एप्रिल रोजी राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयाच्या बाबतीत असा काही प्रकार घडलाच नाही. करोनाविरहित रुग्णांसाठी असलेल्या या रुग्णालयात त्यादिवशी पाच गर्भवतींना दाखल करून घेण्यात आले’, असा दावा सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी प्रतिज्ञापत्राच्या आधारे सुनावणीत केला. तर ‘मुंबईत गर्भवतींची प्रसूती होण्यासंदर्भात पुष्कळ रुग्णालये, प्रसूतीगृहे व दवाखाने असून याप्रश्नी काळजी करण्यासारखे काही नाही. याविषयी प्रतिज्ञापत्रावर तपशील सादर करू’, असे पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सांगितले. त्यामुळे प्रसूतीसाठी किती रुग्णालये, प्रसूतीगृहे व दवाखाने उपलब्ध आहेत, त्यांची तपशीलवार यादी आणि त्या ठिकाणांवर मागील दोन आठवड्यांत झालेल्या प्रसूतींची आकडेवारी २१ मेपूर्वी सादर करावी, असे निर्देश खंडपीठाने पालिकेला दिले. तसेच हा तपशील आल्यानंतर २२ मे रोजी ही याचिका निकाली काढण्याचे संकेत दिले.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

truck bike accident in aurangabad: ट्रकची धडक; दोन तरुण ठार – two young man died in truck and bike accident in aurangabad

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बीडबायपास रोडवरील नाईकनगर गेटसमोर घडली.  Source link

Sanjay Chavan: ‘ती’ जमीन सरकारकडे जमा करा – tehsildar shubham gupta has directed that land should be in the name of the government to...

म. टा. वृत्तसेवा, सटाणाबागलाणचे माजी आमदार संजय कांतीलाल चव्हाण हे आदिवासी नसल्याने त्यांना आदिवासींकडून खरेदी केलेल्या तालुक्यातील ठेंगोडा शिवारातील उमाजी नगर येथील सातबाऱ्यावरील...

more psu in pipeline for disinvestment: Budget 2021 आणखी सरकारी कंपन्यांचे खासगीकरण ; सोमवारी अर्थमंत्री करणार ‘बजेट’मध्ये घोषणा – finance minister unveil privatization plan...

हायलाइट्स: कॅबिनेटच्या बैठकीत खासगीकरण धोरणाला मंजुरी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात २.१ लाख कोटींची निर्गुंतवणूक योजनाआगामी अर्थसंकल्पात किमान पाच कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूकनवी दिल्ली : सार्वजनिक...

Recent Comments