Home महाराष्ट्र mumbai news News : मुंबईत शाडू मातीचा श्रीगणेशा; घरातच मूर्ती घडवण्याच्या सूचना...

mumbai news News : मुंबईत शाडू मातीचा श्रीगणेशा; घरातच मूर्ती घडवण्याच्या सूचना – ganesh idol making workshop started in mumbai


– मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे वातावरण

– सुरक्षेच्या कारणास्तव घरातच मूर्ती घडवण्याच्या सूचना

– मूर्ती केवळ ११, १५, १८, २१ इंच उंचीच्या असतील

‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाने पुढाकार घेतल्यानंतर शाडू मातीचा पहिला टेम्पो शनिवारी, मुंबईत दाखल झाला. पहिल्या खेपेत अंधेरी आणि जोगेश्वरी भागांतील जवळपास १२ मूर्तिकारांना एकूण ८०० गोणी कच्चा माल (शाडूची माती) पुरवण्यात आला आहे. लवकरच आणखी चार फेऱ्यांमध्ये अधिकाधिक मूर्तिकारांपर्यंत माती पोहोचवण्यात येणार असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना घरातच मूर्ती घडवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मूर्ती केवळ ११, १५, १८, २१ इंच उंचीच्या असतील, असे यापूर्वीच मूर्तिकार संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

आगामी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत समन्वय समितीचा निर्णय, उत्सवाबाबत सूचनावली, मूर्तिकार संघाचा शाडू मातीच्या मूर्तींबाबत पुढाकार आणि अलीकडेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शाडू मातीची उपलब्ध करून दिल्यामुळे मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शाडू मातीच्या मूर्ती तयार करा, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या मातीच्या उपलब्धतेबाबत केंद्र वा राज्य सरकारकडून पुढाकार घेतला जात नव्हता. अखेर मूर्तिकार संघाने माती आणण्याबाबत पुढाकार घेतला. ही माती गुजरातहून आणण्यात आली असून, गणपती मूर्तीसाठी वापरण्यात येणारी माती असल्याने राज्यात येताना कुठल्याही तपासणी नाक्यावर टेम्पो अडवण्यात आला नाही. मात्र, राज्य शासनाने जातीने लक्ष घालून ही माती मूर्तिकारांना उपलब्ध करायला हवी, अशी विनंती मूर्तिकार संघाकडून करण्यात आली आहे. तर, उपलब्ध कालावधीत मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती घडवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे कौतुक आहे. या निर्णयाची दखल घेत शासनानेदेखील शक्य तितके सहकार्य करावे, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे कार्याध्यक्ष कुंदन आगासकर यांनी केली.

पहिल्या फेरीत १२ मूर्तिकारांना माती पुरवण्यात आली आहे. तसेच पुढच्या चार फेऱ्यांमध्ये जवळपास एक लाख २८ हजार किलो शाडूची माती मुंबईत आणली जाणार आहे. ज्या विभागामध्ये टेम्पो नेण्याचे नियोजन आहे तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात त्याची माहिती दिली जात आहे. सध्या घरातच सुरक्षेचे सर्व निकष पाळत शक्य तितक्या मूर्ती घडवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. आता राज्य शासनाने या पर्यावरणपूरक प्रयत्नांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

– गजानन (अण्णा) तोंडवळकर, अध्यक्ष, मूर्तिकार संघSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Recent Comments