Home महाराष्ट्र mumbai news News : मॉल, शॉपिंग सेंटर उघडी ठेवण्यास परवानगी द्या; रिटेलर...

mumbai news News : मॉल, शॉपिंग सेंटर उघडी ठेवण्यास परवानगी द्या; रिटेलर असोसिएशनचे आदित्यंना साकडे – malls, shopping centers should be allowed to open


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील मॉल आणि शॉपिंग सेंटरमध्ये सुरक्षित वावराचे नियम पाळत सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ‘रिटेलर असोसिऐशन ऑफ इंडिया’च्या शिष्टमंडळाने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. आदित्य यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना आतापर्यंत दुकानदारांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुक केले.

देशातील असंख्य दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी सायंकाळी आदित्य यांची भेट घेऊन राज्यातील मॉल व शॉपिंग सेंटर अत्यंत काळजीपूर्वक व नियोजनबद्ध पद्धतीने कसे उघडता येतील, या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. सुरक्षित वावराचे नियम काटेकोरपणे पाळत ही दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत उघडण्यात यावीत, अशी मागणी केली.

दरम्यान, भारतातला रिटेल उद्योग अंदाजे ४.६ कोटी नागरिकांना रोजगार पुरवतो. तसेच एकूण वापरखर्चाच्या ४० टक्के भाग हा या उद्योगामार्फत होतो. भारताच्या ठोक राष्ट्रीय उत्पन्नापैकी १० टक्के उत्पन्न हे रिटेल उद्योगातून मिळते. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन शिथिल झाल्यानंतरही अनेक ग्राहक दुकानांमध्ये जाऊन खरेदी करण्यासाठी कचरत आहेत. या ग्राहकांना पुन्हा आत्मविश्वासाने खरेदी करता यावी यासाठी रिटेलर असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्याच्या काळात मागणीमध्ये असलेली अस्थिरता पाहता दुकाने अधिक काळ तसेच आठवड्याचे सर्व दिवस उघडी ठेवण्यात यावीत, अशीही असोसिएशनची मागणी आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘लोकहितवादी’चा सन्मान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकहितवादी मंडळास मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीबद्दलचा...

Bihar election: संयमाची लस टोचा – editorial on bihar election 2020 and bjp promises free covid vaccine to people

विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्वांना करोनाची मोफत लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन, सगळी नैतिकता खुंटीला...

Recent Comments