Home महाराष्ट्र mumbai news News : 'या' आजारांमुळेही वाढला करोना मृतांचा आकडा - corona...

mumbai news News : ‘या’ आजारांमुळेही वाढला करोना मृतांचा आकडा – corona death toll rises as other diseases


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

विविध प्रकारच्या व्याधी असलेल्या २,८९८ करोना रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यासारख्या व्याधींबरोबरच हृदयविकाराचा तीव्र झटका हेदेखील करोनारुग्णाच्या मृत्यूचे कारण ठरले आहे.

मार्चमधील रुग्णांचे प्रमाण, त्यांच्या व्याधींचे स्वरूप आणि जूनमधील रुगणसंख्या व व्याधींच्या स्वरूपामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. संसर्ग वाढणारा असला तरीही अन्य व्याधी असलेल्यांनी अधिक काळजी घेत, कोणत्याही तक्रारींबाबत त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

टास्क फोर्स समितीचे सदस्य व केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी, शरीरात ऑक्सिजनची पातळी किती आहे, याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. चालताना, झोपलेल्या अवस्थेत शरीरातील प्राणवायूची पातळी वेगवेगळी असते, हे लक्षात घेऊन वैद्यकीय उपचारांचे व्यवस्थापन व्हायला हवे याकडे लक्ष वेधले. डीप वेन थ्राम्बोइसिसमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. त्यामुळे करोना झाला की नाही याचे निश्चित निदान होण्यापूर्वी लक्षणे न दाखवताही अचानकपणे मृत्यू ओढावू शकतो. डीवीटी या आजारामध्ये शरिरातील अंतर्गत अवयवामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. या गुठळ्या पायातील नसांमध्ये अधिक असतात. अनेकदा या गुठळ्या रक्ताभिसरणामध्ये अडथळा आणतात. कधीकधी रक्तातील गुठळ्या फुटून फुफ्फुसापर्यंत पोहचल्यामुळे आरोग्यासाठी धोकादायक अवस्था निर्माण होऊ शकते. श्वास घेण्यात त्रास होणे, छातीत वेदना होणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे डॉ. मृदूल नायर सांगतात.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही हृदयविकाराच्या त्रासामुळे होणाऱ्या करोनारुग्णांचे मृत्यू होत असल्याचे आढळून येत असल्याचे सांगितले. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागातील तज्ज्ञांसोबत चर्चा झाली असून तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाची लक्षणे ही प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी आढळून येतात. त्यामुळे या विषाणूचे वर्तन साथीचा संसर्ग वाढल्यानंतर बदलले आहे का, यादृष्टीनेही अभ्यास सुरू आहे. महाराष्ट्रातील करोना संसर्गाच्या अभ्यासामध्ये १,२४६ म्हणजे ३० टक्के रुग्णांमध्ये करोनाशी संबधित कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. ४,१४४ मृत्यूच्या कारणांचा अभ्यास केल्यानंतर त्यात व्याधीग्रस्त रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

वयानुसार धोका कमी-जास्त

हृदयविकार, कॅन्सर, फुफ्फुसाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये करोनासह इतर आजारांची लक्षणे दिसून येतात. या व्यक्ती रूग्णालयात दाखल होईपर्यंत उशीर झालेला असतो. पहिले दोन तास उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. तसे न झाल्यास जीवाला धोका निर्माण होतो. तरुणांमध्ये एकापेक्षा अधिक आजार असले तरीही करोनावर मात करण्याची शक्यता अधिक असते. तुलनेने अधिक वयोगटातील व्यक्तीमध्ये ही शक्यता फार कमी असल्याचे डॉ. राधाकृष्णन यांनी स्पष्ट केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Hingulambika Devi Temple: साडेतीनशे वर्षांचा इतिहास; देवीचे मूळ पाकिस्तानात – three and a half hundred years of history of the hingulambika devi temple

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहराच्या मध्यवस्तीतील म्हणजे रंगारगल्लीतील श्री हिंगुलांबिका देवीच्या मंदिराला ३५० वर्षांचा इतिहास आहे. यंदा करोना परिस्थितीमुळे प्रथमच देवीची मिरवणूक निघणार नाही.नवरात्रात...

Thane: Thane: कामाचे पैसे न दिल्याने प्लंबरने केली कंत्राटदाराची हत्या – man killed contractor at ghodbunder in thane

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कामाचे १२ हजार रुपये न दिल्याने प्लंबरने कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर भागात घडली. हत्येनंतर परराज्यात पळून...

Donald Trumps Filthyair Comment On India, Howdy Modi Trending On Twitter – डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरच्या टिप्पणीनंतर #HowdyModi चा ट्रेन्ड

नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान वारंवार भारताचाही उल्लेख होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल...

Recent Comments