Home शहरं मुंबई mumbai news News : येमेनी सैनिकांना फसवणाऱ्यांना अटक - to those who...

mumbai news News : येमेनी सैनिकांना फसवणाऱ्यांना अटक – to those who deceive the yemeni soldiers


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

येमेनमधील सैनिकांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात उपचार देण्याचा बहाणा करून प्रत्यक्षात दोन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. सौदी अरेबिया आणि येमेनमधील अंतर्गत युद्धात येमेनचे काही सैनिक जखमी झाले होते. त्यांना मुंबईत उपचारासाठी आणले असता दोघा येमेनी नागरिकांनी या सैनिकांची दिशाभूल केली. त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. त्यासाठी सौदी अरेबियाकडून खर्चाचा परतावा मिळेल, असे सांगत त्यांचे पासपोर्ट ताब्यात घेतले. त्या पासपोर्टच्या आधारे सौदीतून सुमारे दोन लाख रुपयांची रक्कम मुंबईत हस्तांतरित करून या दोन्ही आरोपींनी फसवणूक केली.

पवई पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत फहाद अलमक्तरी, अब्दुल गनी अल गुजी या आरोपींना अटक केली.येमेनमधील मोहम्मद गुरबान, अब्दुल ओमर, तौफिक लतीफ, अनीस मोहम्मद, खालेद मोहम्मद ओबड, अब्दुल्लाह मुसेद हे सैनिक उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले होते. सौदी अरेबिया आणि येमेनमध्ये दोन वर्षे अंतर्गत युद्धात गुरबानसह इतर सैनिकांना इजा झाली. गुरबानच्या जबड्याच्या उजव्या बाजूस गोळी लागली. तिथे उपचार सुरू होते. ते उपचार कमी पडल्याने सौदी अरबच्या लष्कराकडून गुरबानसह इतरांना मुंबईत पाठविण्यात आले. त्यांना २३ जानेवारी रोजी मुलुंडमधील फोर्टिज रुग्णालयात दाखल केले होते. ३० जानेवारीस रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर हे सर्व पवईतील लेक ब्लूम रेसिडन्सीमध्ये राहण्यास आले.

पुण्यात उपचार घेणाऱ्या अब्दुला हवादेत या सहकाऱ्याशी संपर्क केला असता त्याने फहाद मक्तरी, अली गुजी या दोघा येमेनी नागरिकांशी संपर्क साधण्यास सांगितले. फेब्रुवारीच्या अखेरीस त्यांचे मक्तरीशी बोलणे झाले. त्यावेळी त्यांनी आपण दिल्लीतील येमेन दूतावसाचे सदस्य असल्याची बतावणी केली. तुमच्यावर अपोलो रुग्णालयात चांगले उपचार होतील व तेथील उपचारांचा खर्च सौदी अरेबियातून मिळेल, असेही आश्वासन दिले. त्याच्या बोलण्यावर या सर्वांनी विश्वास ठेवला. त्यानंतर त्यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात पाठविण्यात आले. तिथे त्यांना अब्दुलगनी अल-घुझी ही व्यक्ती भेटली असता त्यानेही आपण येमेन दूतावासातील सदस्य असल्याचे सांगितले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या सैनिकांनी मुंबईतील कफ परेड येथील येमेन दूतावासाशी संपर्क साधला असता कोणतीही रक्कम पाठविण्यात आली नसल्याचे समजले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : पुन्हा राजकीय ठिणगी पेटणार, उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच होणार प्रसारित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Nashik News : …अन् यशवंतराव चव्हाण नाशिकमध्ये पायी फिरले! – when yashwantrao chavan visited nashik in 1965

'हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री' असे ज्यांचे वर्णन केले जाते ते देशाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण नाशिकमधून चक्क पायी फिरले होते! देशाच्या संरक्षणाची धुरा आपल्या...

Rohit Sharma: India vs Australia : रोहित शर्माची फिटनेस टेस्ट नेमकी होणार तरी कधी, जाणून घ्या तारीख.. – india vs australia : rohit sharma’s...

मुंबई : सध्याच्या घडीला सर्वांचेच लक्ष रोहित शर्माच्य फिटनेस टेस्टकडे लागलेले आहे. कारण जोपर्यंत रोहित ही टेस्ट पास होत नाही, तोपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियाच्या...

bollywood news News : इतकंच असेल त्यानं माझं नाव लावू नये; जानच्या आरोपांमुळे कुमार सानू नाराज – kumar sanu suggests son jaan kumar sanu...

मुंबई: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर जान सानू यानं वडिल कुमार सानू यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी वडिल म्हणून माझी कोणतीही जबाबदारी पार...

Recent Comments