Home शहरं मुंबई mumbai news News: वाडा तालुक्यात रेशनिंगचा काळाबाजार - rationing black market in...

mumbai news News: वाडा तालुक्यात रेशनिंगचा काळाबाजार – rationing black market in wada taluka


– ग्राहक संरक्षणचे माजी सदस्य सिद्धार्थ सांबरे यांचा आरोप

– पुरवठा कोकण उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, वाडा

सरकारी रास्त भाव धान्यवितरण दुकानदारांकडून लाभार्थ्यांची फसवणूक करून अन्नधान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप पालघर ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य सिद्धार्थ सांबरे यांनी केला आहे. तसेच, त्यांनी या प्रकाराची तातडीने चौकशी करून, कारवाईची मागणी करणारे ऑनलाइन पत्र अन्न व नागरी पुरवठा विभाग, कोकण विभागीय उपायुक्त व पालघर जिल्हाधिकारी यांना लिहिले आहे.

वाडा तालुक्यातील एका रेशनिंग दुकानात, रेशनकार्डधारकांनी न घेतलेल्या अन्नधान्याची मशिनद्वारे परस्पर ऑनलाइन पावती काढल्याने हा गैरप्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन आहे त्यामुळे लोकांना या काळात अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी सरकारने रास्त भाव धान्य दुकानात धान्य उपलब्ध करून दिले आहे. तालुक्यातील एका दुकानात काही महिला धान्य घेण्यास गेल्या असता त्यांना रेशनिंग दुकानदाराने मंजूर असलेले धान्य देण्यास नकार दिला. याबाबत संशय वाटू लागल्याने रेशनकार्ड नंबर ऑनलाइन तपासले असता त्यांच्या रेशनकार्डवर मंजूर असलेल्या धान्याची पावती डिलरच्या नावाने काढल्याचे दिसले. त्यावरून दुकानदाराने धान्याचा अपहार केल्याचे दिसले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्वसामन्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेशनिंग दुकानदारावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सांबरे यांनी केली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात सर्वत्र अशीच परिस्थिती असू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या धान्यवाटपाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सदर पत्राची दखल कोकण विभाग उपायुक्त(पुरवठा) यांनी घेऊन पालघर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना त्यासंबंधी पत्र पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकरी यांनी वाडा तहसीलदार यांना रास्त भाव धान्य दुकानाची तपासणी करून अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कोकण विभागाच्या उपायुक्तांकडे (पुरवठा) करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आलेल्या चौकशी करण्याच्या पत्राच्या माध्यमातून मी चौकशी सुरू केली आहे. सदर अहवाल वाड्याच्या तहसीलदारांकडे योग्य त्या कारवाईसाठी सादर करण्यात येईल.

प्रवीण भागवत, पुरवठा निरीक्षण अधिकारी, वाडा

एकीकडे लोकांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अशावेळी अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र, दुसरीकडे सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या रेशनिंग दुकानात सुरू असलेला घोटाळा संतापजनक आहे. वाडा तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानांची याच अनुषंगाने चौकशी करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे.

डॉ. सिद्धार्थ सांबरे, सदस्य माजी ग्राहक सं.प.पालघर

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

maharashtra budget 2021: राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता – maha vikas aghadi government trying to give concession in petrol and...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली असल्याने यातून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकार...

THE NEW JIOPHONE 2021 OFFER: Reliance Jio चा नवा धमाका, ७४९ रुपयांत वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा – jiophone 2021 offer announced with 2...

हायलाइट्स:रिलायन्स जिओची जबरदस्त ऑफर १ मार्च २०२१ पासून या ऑफरला सुरुवात होणार THE NEW JIOPHONE 2021 OFFER असे नाव नवीन आणि जुन्या ग्राहकांना...

Recent Comments