Home शहरं मुंबई mumbai news News : ‘सीकेपी’ला हवेत ८० ते १०० कोटी रुपये -...

mumbai news News : ‘सीकेपी’ला हवेत ८० ते १०० कोटी रुपये – 80 to 100 crore to ckp


– सरकारी प्रयत्नातून भागभांडवल वाढविण्याची ठेवीदारांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

लाखो ठेवीदारांचा पैसा अडकून पडलेली सीकेपी बँक परिचालनात्मक नफ्यात आली आहे. अद्यापही बँक वाचू शकते. त्यासाठी बँकेला साधारण ८० ते १०० कोटी रुपयांच्या सरकारी मदतीची गरज आहे. हा आकडा चार वर्षांपूर्वी ५० कोटी रुपयांच्या घरात होता. राज्य किंवा केंद्र सरकारने अन्य बँकांप्रमाणे याही बँकेला वाचवावे, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.

२०१४ पासून निर्बंधात असलेल्या सीकेपी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी रद्द केला. यामुळे बँकेतील १ लाख ३१ हजार ५०० खातेदार-ठेवीदारांचे ४८५ कोटी रुपये संकटात आले आहेत. ही रक्कम वाचविण्यासाठी बँकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी निकराचे प्रयत्न केले. त्यामध्ये बुडीत कर्जांची वसुली करण्यापासून ते भागभांडवल वाढविण्यात आले. ठेवीदारांनीही स्वत:च्या तब्बल २५ कोटी रुपयांच्या ठेवी भागभांडवलात वळत्या केल्या. याद्वारे बँकेची स्थिती सक्षम करण्याचे प्रयत्न करण्यात आले. आता सरकारनेही मदत केल्यास बँक वाचू शकेल, अशी ठेवीदारांची मागणी आहे.

सीकेपी बँक डिपॉझिटर फोरमचे राजू फणसे यांनी ‘मटा’ ला सांगितले की, ‘ठेवीदारांनी भाग भांडवल वाढवले. तसे सरकारनेही स्वनिधी पद्धतीने भाग भांडवल वाढविण्यासाठी मदत करायला हवी. केंद्र सरकारने याआधी गुजरातमधील माधवपुरा सहकारी बँकेला तब्बल ८०० कोटी रुपयांची मदत केली आहे. सरकारी बँका वाचविण्यासाठी त्यात ७० हजार कोटी रुपयांची मदत दिली. अलिकडे येस बँकेसाठी २० हजार कोटी रुपये सरकारने उभे केले. मग लाखो सर्वसामान्य ठेवीदार असलेल्या या बँकेला वाचविण्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत, परवाना रद्द झाल्यानंतर अनेक बँका याआधी पुनरूज्जीवित झाल्या आहेत. केवळ सरकारने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.’

वसुली आवश्यक

बँकेतील अनुत्पादित कर्ज अर्थात एनपीएचे प्रमाण ९७ टक्क्यांवर गेले आहे. त्याचा आकडा १५३ कोटी रुपयांच्या घरात आहे. वास्तवात एकदा अनुत्पादित कर्ज इतक्या मोठ्या प्रमाणावर गेल्यानंतर बँक वाचणे कठीण आहे. पण बुडालेल्या कर्जांची निकराने वसुली केल्यास बँक वाचू शकते. वास्तवात हे प्रयत्न याआधीच व्हायला हवे होते, असे मत माजी अध्यक्षांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi To Visit Punes Serum Institute Of India On Saturday – PM Modi: करोनावरील लस केव्हा येणार?; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष

पुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून...

sangli crime: Sangli Crime: चुलती व पुतण्याची आत्महत्या; कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले – sangli crime aunt and nephew commit suicide

सांगली:तासगाव तालुक्यातील हातनूर येथे चुलती आणि तिच्या पुतण्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. २५) पहाटे घडला. अनुराधा गणेश सुतार आणि...

Recent Comments