Home शहरं मुंबई mumbai news News : हवाई क्षेत्र पोरकेच - airfield porkech

mumbai news News : हवाई क्षेत्र पोरकेच – airfield porkech


– हवाई दलाच्या आकाश विमानांना देणे अनुपयोगी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

हवाई दलाच्या ताब्यातील आकाश व्यावसायिक विमानांसाठी उघडून हवाई क्षेत्राला बळकटी देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शनिवारी केली. पण त्याचा विमानसेवा कंपन्यांना व्यावसायिक फायदा फारसा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हवाई क्षेत्राकडून नाराजी व्यक्त होत आहे.

देशभरातील काही आकाश हवाई दलाच्या ताब्यात आहेत. तेथून हवाई दल वगळता कोणालाही उड्डाणाची परवानगी नाही. यामुळे अनेकदा वैमानिकांना हे आकाश सोडून काहीसे लांबून मार्गक्रमण करावे लागते. त्यात इंधन अधिक खर्च होते. आता लॉकडाउनदरम्यान नुकसानीचा सामना करणाऱ्या विमानसेवा कंपन्यांसाठी हे आकाश आता खुले केले जाणार आहे. पण त्याचा फार उपयोग होण्याची शक्यता वैमानिकांची फेटाळली आहे.

हवाई दलातील माजी वैमानिक व सध्या एका खासगी कंपनीत वैमानिक असलेले प्रशांत करडे यांनी सांगितले की, ‘मुळात आता असे फार कमी आकाश राहिले आहे, जिथून विमानांना लांबून मार्गक्रमण लागते. हवाईतळांजवळील बहुतांश आकाश व्यावसायिक विमानांसाठी उघडे आहेच. त्यातून ज्या आकाशातून जाण्याची परवानगी नाही, तेथे अधिकाधिक पाच मिनिटांपर्यंतचा फेरा अतिरिक्त पडतो. या पाच मिनिटांमधील इंधन वापर जेमतेम ३०० ते ४०० किलो असते. त्यापेक्षा दुप्पट इंधन तर मुंबईसारख्या विमानतळांवर उड्डाण होईपर्यंत खर्च होते.’

खर्च अधिक

एकूणच असे आकाश खुले करण्यातून इंधन बचत फारच तोकडी असेल. दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमान कंपन्यांसाठी १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे. हे पॅकेजदेखील तुरळक आहे. विमानसेवा कंपन्यांचा विमान देखभाल व दुरुस्तीसह रोजचा खर्च १० कोटी रुपयांच्या घरात असतो. आपल्या देशात पाच मोठ्या कंपन्यांना आहेत. १ हजार कोटी रुपयांनुसार त्यांना प्रत्येकी २०० कोटी रुपये मिळाल्याचे स्पष्ट होते. याचा अर्थ प्रत्येक कंपनीला जेमतेम २० दिवसांचे अर्थ साहाय्य करण्यात आले असून ते पाने पुसल्यासारखे आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments