Home शहरं मुंबई mumbai news News : २४ तासांत तीन पोलिसांचा मृत्यू; मुंबईत ३७, तर...

mumbai news News : २४ तासांत तीन पोलिसांचा मृत्यू; मुंबईत ३७, तर राज्यात ५७ जण दगावले – due to coronavirus three policemen killed in 24 hours


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

लॉकडाउन सुरू झाल्यापासून जीवाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस दलाला करोनाचा विळखा दिवसागणिक अधिकच घट्ट बसत चालला आहे. गेल्या २४ तासांत मुंबई पोलिस दलातील तिघांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मरीन ड्राइव्ह, दादर आणि समता नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या या तीन पोलिसांच्या मृत्यूमुळे मुंबईतील मृत पोलिसांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. राज्यामध्ये ही संख्या ५७ वर गेल्यामुळे पोलिस दल प्रचंड धास्तावले आहे.

दहशतवाद्यांचा सामना करणारे, अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडणारे मुंबई पोलिस मार्चपासून करोना या अदृश्य शत्रूचा सामना करीत आहेत. यामुळेच सर्वात जास्त करोनाची लागण ही पोलिसांनी झाली आहे. मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार पांडुरंग पवार यांना प्रकृती अस्वास्थामुळे १४ जून रोजी अंधेरी येथून सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरू होते मात्र गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगाव येथे वास्तव्यास असलेल्या पवार यांच्यामागे पत्नी, चार मुली असा परिवार असून एका मुलीचे लग्न झाले आहे.

समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण कक्षामध्ये कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल संजय मोरे यांच्यावर गुरुनानक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अधिक ढासळल्याने ते उपचार प्रतिसाद देत नव्हते आणि गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. दादर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल ब्रम्हदेव शेडगे यांचाही गुरुवारी करोनाने मृत्यू झाला.

राज्यासह मुंबईत लॉकडाउन सुरू असले, गुन्हेगारी आटोक्यात असली, तरी कायदा आणि सुव्यवस्था राखणे, लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे, नाकाबंदी, गर्दी होऊ नये यासाठी बाजार, वस्त्यांमध्ये गस्त अशा कामांमुळे पोलिसांचा अधिकाधिक संपर्क सर्वसामान्य नागरिकांशी येऊ लागला. यामुळेच राज्यभरात चार हजारांहून अधिक पोलिसांना करोना विषाणूची लागण झाली. तीन हजारांहून अधिक पोलिस यातून बरे होऊन घरी परतले, तर बहुतांश ड्युटीवर हजरही झाले. सद्यस्थितीत ९९१ पोलिस राज्यभरात उपचार घेत आहेत.

पोलिस दल धास्तावले

बरे होणाऱ्या पोलिसांची संख्या अधिक असली, तरी मृत्यू थांबत नसल्याने पोलिस धास्तावले आहेत. सुरुवातीला योग्य वेळी मदत न मिळणे, खाटा उपलब्ध नसणे, उपचारांमध्ये हेळसांड अशा समस्यांना पोलिसांना सामोरे जावे लागत होते. मात्र पोलिस कुटुंब आरोग्य योजनेत करोनाचा समावेश करण्यात आला. पोलिसांना तत्पर उपचार मिळावेत, यासाठी खासगी रुग्णालयात त्यांच्यासाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या. पोलिस ठाण्यात योग्य ती खबरदारी घेतली जात असतानाही पोलिस मृत्यू थांबत नसल्याने वरिष्ठ अधिकारी हतबल आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Chloe Zhao: आशियाचा सन्मान : क्लोई जाओ – chloe zhao is becoming the first asian woman to ever win the prize for best director

'करुणा सर्व बंधने पार करते आणि मग तुमची वेदना माझी वेदना बनते...' गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांनी याच कार्यक्रमात व्यक्त...

LIVE : मुंबईसाठी आरोग्य विभागाचं मोठं पाऊल, आता 3 ऐवजी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण | News

7:04 am (IST) विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा चर्चेचा दुसरा आणि अंतिम दिवस चर्चेला मुख्यमंत्री उद्धव...

illegal parking in mumbai: अवैध पार्किंग जोरात – mumbai traffic police not strict action against illegal road parking in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेने आपल्या वाहनतळांच्या परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले. मात्र पोलिसांनी अद्याप ही कारवाई सुरू केलेली नाही....

Recent Comments