Home शहरं मुंबई mumbai news News : Coronavirus: राज्यात आज करोनाचे १४२ बळी; दिवसभरातील रुग्णसंख्येचा...

mumbai news News : Coronavirus: राज्यात आज करोनाचे १४२ बळी; दिवसभरातील रुग्णसंख्येचा नवा उच्चांक – 142 deaths and highest single day rise of 3827 new covid19 cases reported in maharashtra


मुंबई: राज्यात आज करोना संसर्गामुळे १४२ जणांचा मृत्यू झाला तर ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. एकाच दिवसातील रुग्णसंख्येचा हा नवा उच्चांक ठरला आहे. सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा असून आज १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ६२ हजार ७७३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

वाचा: औरंगाबादचा ‘धारावी’ होतोय? आजही ९१ नव्या बाधितांची भर

राज्यात १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू पुढीलप्रमाणे :

ठाणे -१२४ ( मुंबई ११४, ठाणे २, वसई-विरार ५, रायगड ३), नाशिक-९ (नाशिक, धुळे, जळगाव प्रत्येकी ३), पुणे-१ (सोलापूर १), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ८). आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहेत.

आज नोंद झालेल्या १४२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७४ रुग्ण आहेत तर ५७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८९३ झाली आहे.

राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खासगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी १ लाख २४ हजार ३३१ नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा: मुंबईतल्या ‘या’ प्रसिद्ध रुग्णालयाची कँटीन बनलीय करोनाची हॉटस्पॉट

मुंबईत ११४ रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज दिवसभरात करोनाने ११४ रुग्ण दगावले तर १ हजार २६९ नवीन रुग्णांची भर पडली. मुंबईतील करोनामृत्यूंचा एकूण आकडा ३ हजार ४२३ इतका झाला असून एकूण रुग्णसंख्या ६४ हजार ६८ वर पोहचली आहे. धारावीत करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत आहे. आज धारावीत १७ नवीन रुग्ण आढळले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. धारावीतील एकूण रुग्णसंख्या २१५१ झाली असून आतापर्यंत ७९ रुग्ण दगावले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ashok Chavan taunts Narayan Rane: नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर अशोक चव्हाणांची टोलेबाजी – pwd minister ashok chavan taunts bjp mp narayan rane

औरंगाबाद: 'नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर मी अधिका भाष्य करणार नाही. खरंतर त्यांच्या टीकेवर कोणी प्रतिक्रिया देखील दिलेली नाही....

mehbooba mufti: ‘मेहबूबांनी पाकिस्तानात जावे, हवे तर मी तिकीट काढून देतो’ – deputy cm of gujrat nitin patel attacks on mehbooba mufti saying she...

अहमदाबाद: गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कलम ३७०...

blast in Pakistan: Pakistan blast पाकिस्तान: पेशावरमध्ये मदरशात भीषण स्फोट; सात ठार, ७० जखमी – pakistan blast news blast near madrasa in peshawar

पेशावर: पाकिस्तानमधील पेशावर येथील डार कॉलनीत भीषण स्फोट झाला आहे. मदरशात झालेल्या या स्फोटात सातजण ठार झाले असून जवळपास ७० जखमी झाले आहेत....

Recent Comments