Home महाराष्ट्र mumbai news News : Sanjay Nirupam अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; निरुपम यांनी...

mumbai news News : Sanjay Nirupam अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; निरुपम यांनी विचारला ‘हा’ सवाल – sanjay nirupam raised questions on the appointment of ajay mehta


मुंबई: ‘अजोय मेहता यांना मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून मानाचे पद देऊन काँग्रेसला डिवचण्यात आले आहे’, असा थेट आरोप करत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी या नियुक्तीवर जोरदार आक्षेप घेतला आहे. ( Sanjay Nirupam on Ajoy Mehta )

वाचा: अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

संजय निरुपम यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून अजोय मेहता यांच्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. त्याचवेळी त्यांनी स्वपक्षाच्या स्वाभिमानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘महाराष्ट्रात ज्या मुख्य सचिवांमुळे काँग्रेसचे सर्व मंत्री त्रस्त आहेत, त्याच अधिकाऱ्याला ३० जून रोजी निवृत्त झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागारपदाची धुरा दिली जाणार आहे. हा निर्णय काँग्रेसला डिवचण्यासाठीच घेण्यात आला आहे किंवा शिवसेनेला काँग्रेसची कोणतीच पर्वा नाही, असा त्याचा अर्थ निघतो’, असे नमूद करत ही कसली आघाडी?, असा सवाल निरुपम यांनी विचारला आहे.

विशेष म्हणजे अजोय मेहता यांच्या नियुक्तीवर काँग्रेस मधून अन्य कोणत्याच नेत्याची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसचे राज्यातील आघाडीचे नेते या निर्णयावर समाधानी नसल्याची कुजबूज आहे. बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी या नेत्यांची या विषयी चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. या चर्चेचा तपशील मात्र मिळू शकलेला नाही.

वाचा: मंत्र्यांना ४६ दिवसात जमलं नाही ते पवारांनी २ तासात करुन दाखवलं

दरम्यान, अजोय मेहता यांना दोनवेळा मुख्य सचिवपदी मुदतवाढ मिळाली होती. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रशासनातील प्रमुख अधिकारी म्हणून मेहता यांच्याबाबतीत विशेष बाब म्हणून निर्णय घेतला होता. ही मुदतवाढ येत्या ३० जून रोजी संपत असताना पुन्हा एकदा मेहता यांना मुदतवाढ मिळणार का?, हा प्रश्न गेले काही दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात कळीचा ठरला होता. त्यात मेहता यांना पुन्हा मुदतवाढ देण्यास काँग्रेस व राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे सांगण्यात येत होते. या प्रश्नावरील चर्चेला बुधवारीच पूर्णविराम मिळालेला आहे. मेहता यांना पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यांच्या जागी मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची नियुक्ती होईल, यावर कालच शिक्कामोर्तब झाले. त्याचवेळी मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचाही निर्णय झाला. १ जुलैपासून मेहता ही नवी जबाबदारी सांभाळणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांच्या ट्विटने मेहतांवरून नवा वाद सुरू झाला आहे. निरुपम हे सध्या काँग्रेसमध्ये एकाकी पडलेले असले तरी त्यांच्या ट्विटमधून काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या मनातील सल बाहेर आलीय का, हे निश्चितच येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

वाचा: शहीदांचं बलिदान आणि इंधन दरवाढ; मोदी सरकारला काँग्रेस घेरणारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments