Home महाराष्ट्र Mumbai Police: Mumbai Police करोनाशी लढा: मुंबई पोलीस दलात केले 'हे' मोठे...

Mumbai Police: Mumbai Police करोनाशी लढा: मुंबई पोलीस दलात केले ‘हे’ मोठे फेरबदल – mumbai ten senior police officers transferred


मुंबई:मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या दहा पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. मुंबईत करोनाचा कहर वाढत असतानाच राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बदली करण्यात आलेल्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याच्या सूचना देखील पोलिसांना करण्यात आल्या आहेत. ( Mumbai Police Transfer )

वाचा: गणपती बसणार नाहीच; ‘लालबागचा राजा’चं मंडळ ठाम

दक्षिण मुंबईतील परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांची पोलीस मुख्यालयात उपायुक्त अभियान या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी परिमंडळ ७ चे पोलीस उपयुक्त परमजितसिंग दहिया यांची बदली करण्यात आली आहे. सुरक्षा आणि संरक्षण विभागाचे पोलीस उपयुक्त प्रशांत कदम यांच्याकडे परिमंडळ ७ ची जबाबदारी देण्यात आली आहे तर विशेष शाखा-१ चे गणेश शिंदे हे बंदर परिमंडळचे कामकाज पाहतील. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे सायबर आणि सायबरचे उपायुक्त विशाल ठाकूर यांची परिमंडळ ११ येथे बदली करण्यात आली आहे.

वाचा: मुंबईत दोन दिवस मुसळ’धार’; घरातच थांबा; पोलिसांच्या सूचना

बदली करण्यात आलेल्या इतर अधिकाऱ्यांमध्ये शहाजी उमाप (विशेष शाखा १), डॉ. मोहन दहीकर (गुन्हे शाखा), प्रणय अशोक (परिमंडळ ५), नंदकुमार ठाकूर (मुख्यालय-१) यांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त मुख्यालय -२ या पदाचा कार्यभार सध्या नंदकुमार ठाकूर यांच्याकडे असेल. तर पोलीस उपायुक्त सरंक्षण आणि सुरक्षा या पदाची जबाबदारी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सांभाळतील. मुंबईत करोना विषाणूची परिस्थिती गंभीर असल्याने बदली करण्यात आलेल्या पोलिसांनी लगेचच पदभार स्वीकारावा असे निर्देश देण्यात आले आहेत.

वाचा: मुंबईत ७५४ कंटेन्मेंट झोन तर, ६२५३ इमारती सीलSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gupkar Declaration: काश्मिरात हालचालींना वेग; मेहबूबा मुफ्तीच्या निवासस्थानी आज मोठी बैठक – gupkar declaration peoples alliance for declaration meeting at mehbooba mufti residence

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या निवासस्थानी पीपल्स अलायन्स फॉर डिक्लरेशची (PAD) आज बैठक होत...

Devendra Fadnavis Corona Positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; केलं ‘हे’ आवाहन – opposition leader devendra fadnavis tests positive for covid 19

मुंबई: करोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे....

Recent Comments