Home महाराष्ट्र Mumbai Police: Mumbai Police: ... म्हणून मुंबईतील सहा पोलिसांविरुद्धच दाखल झाले गुन्हे...

Mumbai Police: Mumbai Police: … म्हणून मुंबईतील सहा पोलिसांविरुद्धच दाखल झाले गुन्हे – 6 constables booked for not reporting to duty: mumbai police


मुंबईः करोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. मात्र, असे असतानाच पोलिस खात्यातील सहा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे. सहा कर्मचारी ड्युटीवर येत नसल्याचा ठपका ठेवत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai Police)

बोरिवली पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या सहा पोलिस कॉन्स्टेबल मागील दोन महिन्यांपासून गैरहजर आहेत. याप्रकरणी या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी नोटिसही बजावण्यात आली होती. अनेकदा नोटिश धाडूनही कर्तव्यावर हजर झाले नाहीत. त्यामुळं पोलीस प्रशासानानं त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबई पोलीस कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गंत गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईत करोनाचा कहर वाढत चालला आहे. जारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. यासगळ्याचा ताण पोलिसांवर आहे. अशात कामावर गैरहजर राहिल्यानं पोलिसांवर भार अधिक वाढत आहे. त्यामुळंच ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचाः मुंबईत पुन्हा संचारबंदी; पण ‘यांना’ वगळले; मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

महाराष्ट्र पोलिस दलातही करोनानं थैमान घातलं आहे. आत्तापर्यंत एकूण करोनाग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ०९७ झाली असून ५९ जणांना करोनामुळं प्राण गमवावे लागला आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या पोलिसांमध्ये १२२ अधिकारी असून आत्तापर्यंत ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, करोनामुळं मृत्यू झालेल्या पोलिसांच्या परिवाराला सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसंच. पोलिसांच्या कुटुंबीयांना संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी निवासस्थानात वास्तव्य करता येणार आहे.

वाचाः ‘सरकारच्या अशा वागण्यामुळं आरक्षणाचं काय होईल ही भीती वाटते’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sensex today: शेअर बाजार ; सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वधारले – sensex nifty gain today

मुंबई : सकाळच्या सत्रात ४०० अंकांची झेप घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर १६३ अंकांच्या वाढीसह स्थिरावला. तो ४०७०७ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी...

Bombay high court: डॉक्टरला मारहाण; एक लाखाचा दंड – beating the doctor; a fine of one lakh

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘करोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर लॉकडाउन काळात सर्व लोक घरात असताना डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळच्या लोकांपासून दूर...

Recent Comments