म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई विद्यापिठाचे कुलसचिव म्हणून डॉ. अजय देशमुख यांनी २४ जानेवारी २०१९ रोजी पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी डॉ. देशमुख यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कुलसचिवपद भूषविले होते. तत्पूर्वी संचालक महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ या पदावरही त्यांनी कामाची मोहोर उमटविली होती. डॉ. देशमुख यांनी पदव्युत्तर शिक्षण एम. ए. इंग्रजीतून पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी पीएचडीही प्राप्त केली.