Home आपलं जग करियर Mumbai University Exams: डिग्री परीक्षा, मूल्यांकन कसे? मुंबई विद्यापीठाने जारी केली माहिती...

Mumbai University Exams: डिग्री परीक्षा, मूल्यांकन कसे? मुंबई विद्यापीठाने जारी केली माहिती – mumbai university circular about all exams and valuation details


विद्यापीठ परीक्षांच्या बाबतीत प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या मनात संभ्रम राहू नये म्हणून मुंबई विद्यापीठाने एक परिपत्रक जारी केले आहे. परीक्षा कशा घेतल्या जाणार यासंबंधी यात विस्तृतपणे माहिती देण्यात आली आहे.

१) सत्रनिहाय परीक्षा पुढीलप्रमाणे होतील –

– सत्र पद्धतीतील दोन वर्षांचा अभ्यासक्रम असल्यास चौथ्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.
– सत्र पद्धतीतील तीन वर्षांचा अभ्यासक्रम असल्यास सहाव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.
– सत्र पद्धतीतील चार वर्षांचा अभ्यासक्रम असल्यास आठव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.
– सत्र पद्धतीतील पाच वर्षांचा अभ्यासक्रम असल्यास दहाव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.
– वार्षिक पद्धतीतील एक वर्षाचा अभ्यासक्रम असल्यास पहिल्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.
– वार्षिक पद्धतीतील दोन वर्षांचा अभ्यासक्रम असल्यास दुसऱ्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.
– वार्षिक पद्धतीतील तीन वर्षांचा अभ्यासक्रम असल्यास तिसऱ्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.
– वार्षिक पद्धतीतील दोन वर्षांचा अभ्यासक्रम असल्यास चौथ्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.

२) अंतिम सत्राच्या / वर्षाच्या परीक्षेस प्रविष्ठ असलेले विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय आदी सत्र / वार्षिक परीक्षेत काही विषयांत अनुत्तीर्ण (ATKT) असल्यास त्या विषयांच्या परीक्षादेखील जुलै महिन्यातच घेण्यात येतील.

विद्यापीठ परीक्षांसाठी यूजीसीने सुचवले वेगवेगळे पॅटर्न

३) विद्यार्थी अंतिम सत्रात उत्तीर्ण असेल मात्र प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या काही विषयात अनुत्तीर्ण असेल (ATKT) तर त्या अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा जुलै २०२० मध्ये घेण्यत येईल.

४) जुलै २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या अंतिम सत्राच्या परीक्षा या १३ मार्च २०२० पर्यंत शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येतील.

५) विद्यार्थ्यांच्या किमान उपस्थितीबाबतची टक्केवारी लक्षात घेता, लॉकडाऊन कालावधी हा त्या विद्यार्थ्यांचा उपस्थित कालावधी म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.

६) अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोडून इतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ग्रेडिंग पद्धतीनुसार (५० टक्के अंतर्गत व ५० टक्के मागील सत्रातील गुण) करून निकाल जाहीर करण्यात येईल व त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल व त्यांच्या अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा ही कॉलेड सुरू झाल्यानंतर १२० दिवसांच्या आत घेण्यात येईल.

७) ज्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या नियमांमुले २०१९-२० मध्ये प्रवेश मिळाला नव्हता अशा विद्यार्थ्यांनासुद्धा पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल.

CBSE Date Sheet 2020: सीबीएसई १० वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

८) २०१९-२० मध्ये अंतिम वर्ष सोडून अन्य विद्यार्थ्यांच्या सम सत्रांच्या (सत्र – २,४,६,८) परीक्षांच्या निकालाची कार्यवाही ग्रेडिंग पद्धतीनुसार (५० टक्के अंतर्गत व ५० टक्के मागील सत्रातील गुण) करण्यात येईल.

९) ज्या अभ्यासक्रमांमध्ये अंतर्गत गुणांची पद्धत नसेल त्यांच्या मागील सत्रातील गुणांच्या आधारे निकाल जाहीर होईल.

१०) विद्यार्थी ग्रेडबाबत समाधाने नसल्यास पुढील सत्रात परीक्षा देऊन ग्रेडमध्ये सुधारणा करून घेऊ शकतो.

११) अंतिम सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक २० जूननंतर जाहीर करण्यात येईल.

शाखानिहाय कोणत्या सत्रांच्या होणार परीक्षा त्याचा तक्ता पाहा –

सत्रनिहाय अशा होणार परीक्षा

maharashtra times

सत्रनिहाय अशा होणार परीक्षाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कारभारी लयभारी: मारहाणीच्या घटनेनंतर ‘कारभारी लयभारी’ तील गंगाने मानले मुंबई पोलिसांचे आभार – karbhari laybhari ganga pranit hate thanks mumbai police

हायलाइट्स:व्हिडिओद्वारे मानले पोलिसांचे आभारपोलिसांनी केली तात्काळ मदतमारहाणीनंतर केला होता व्हिडीओ शूटमुंबई- काही दिवसांपूर्वी 'कारभारी लयभारी' या मालिकेत गंगाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला मारहाण झाली...

rahul gandhi push up: Rahul Gandhi : राहुल गांधींचे मंचावर पुशअप्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल – congress leader rahul gandhi push up with student...

हायलाइट्स:राहुल गांधी तीन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावरविद्यार्थ्यांसोबत स्टेजवर मारले पुशअप्समंचावर विद्यार्थ्यांसोबत घेतला थिरकण्याचा आनंदचेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी...

Recent Comments