Home महाराष्ट्र mumbai's dabbawala dies: mumbai's dabbawala: मुंबईच्या डबेवाल्यापर्यंत पोहोचला करोना; पहिल्या डबेवाल्याच्या मृत्यूची...

mumbai’s dabbawala dies: mumbai’s dabbawala: मुंबईच्या डबेवाल्यापर्यंत पोहोचला करोना; पहिल्या डबेवाल्याच्या मृत्यूची नोंद – mumbai’s dabbawala dies due to coronavirus


मुंबईः जगात मॅनेजमेंटचे गुरू म्हणून ओळख असणारे मुंबईच्या डबेवाल्यांपर्यंत करोना येऊन पोहोचला आहे. करोनामुळं मुंबईत डबेवाल्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत पहिल्या डबेवाल्याच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष तळेकर यांनी ही माहिती दिली.

करोनामुळं मृत्यू झालेल्या डबेवाला हा मालाड येथे वास्तव्यास होते. करोनाची लागण झाल्याचं कळताच त्यांना उपचारांसाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारांदरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना करोनाची लागण झाल्याचं कळताच पत्नीला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर, त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाला आजी-आजोबांकडे पाठवण्यात आलं आहे.

वाचाः मुंबईत तीन करोनाबाधित पोलिसांचा मृत्यू; २४ तासांत ३८ पोलिसांना लागण

डबेवाल्यांचं काम बंद होऊन आता जवळपास तीन महिने उलटून गेले आहेत. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्याच्या विचारात असलेले डबेवाले त्यांच्या सहकाऱ्याच्या मृत्यूमुळं चिंतेत सापडले आहेत. सेवा पुन्हा सुरू करायची की नाही याचा आम्ही पुर्नविचार करत आहोत. कोणाचाही जीव धोक्यात घालून निर्णय घेण्याची घाई करणार नाही असं मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष तळेकर यांनी सांगितलं.

वाचाः करोनामुक्त रुग्णांमध्ये आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला धक्का

डबेवाल्यांसाठी राज्य सरकारकडून २ हजारांची मदत जाहीर करण्यात आली असली तरी त्याचा व्यवसाय कधी आणि कसा सुरू होईल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. डबेवाल्यांची सेवा पूर्णपणे लोकल सेवेवर अवलंबून आहे. लोकल ट्रेन सुरू होईपर्यंत आम्ही कामही सुरू करू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः ‘कोविड योद्धा’ होण्यासाठी २१ हजार अर्ज; पण ‘इतक्याच’ उमेदवारांची झाली निवड

दरम्यान, ब्रिटिशांच्या काळापासून तब्बल १३० वर्षे ज्यांनी मुंबईच्या चाकरमान्यांच्या पोटाची काळजी घेतली; उन, थंडी, वारा, पाऊस अथवा परिस्थिती कितीही बिकट असो त्याची तमा न बाळगता ज्याने आपली सेवा मुंबईकरांना दिली, तो मुंबईचा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा डबेवाला लॉकडाउनमुळे उपासमारीच्या झळा सोसतो आहे. त्याला वेळीच मदतीचा हात न दिल्यास हा कष्टकरी वर्ग कोलमडून पडण्याच्या टोकावर उभा आहे. मुंबई डबेवाल्यांना आपला रोजगार पुढच्या काळात पुन्हा सुरळीत होईल, की नाही याची चिंता आता सतावू लागली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Recent Comments