Home देश muslim couple host hindu girl marraige: लॉकडाउनमध्ये बंधुभावाचे दर्शन; मुस्लिम जोडप्याने केले...

muslim couple host hindu girl marraige: लॉकडाउनमध्ये बंधुभावाचे दर्शन; मुस्लिम जोडप्याने केले हिंदू मुलीचे कन्यादान – fraternity ludhiana muslim couple host hindu girl marraige and makes kanyadan


लुधियाना: देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात परस्परभेदाच्या बातम्या येत असतानाही दोन्ही धर्मियांमधील बंधुत्वाचे नाते सांगणाऱ्या घटनाही देशात घडत आहेत. पंजाबच्या लुधियानामध्ये अडकलेल्या एका हिंदू जोडप्याचे मुस्लिम कुटुंबानं लग्न केले आहे. खास गोष्ट म्हणजे हा विवाह संपूर्ण हिंदू रीतीरिवाजांनी पार पडला. मुस्लिम कुटुंबाने सर्व विधी पार पाडले. इतकेच नाही, तर या मुस्लिम जोडप्याने वधूचे विधिवत कन्यादानही केले.

भाटियान येथील रहिवासी पूजा आणि सहनेवाल येथील रहिवासी सुदेश कुमार यांचा विवाह लॉकडाउनच्या आधीच ठरलेला होता. पूजाचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील मुरादाबादचे आहे. लॉकडाउन लागू होण्यापूर्वी वडील वारिंदर कुमार, आई, भाऊ आणि तीन बहिणी गावी गेल्या होत्या. मात्र, पुढे लॉकडाउन लागू झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब गावात अडकले. कुटुंबीयांनी लुधियानाला पोहोचण्याचा प्रयत्न केला पण त्याला परवानगी मिळू शकली नाही.

पूजाच्या वडिलांपुढील समस्या केली दूर

बिहारमधील कटियार येथे राहणारा अब्दुल साजिद पूजाच्या वडिलांबरोबरच सूत कारखान्यात काम करतो. जेव्हा त्यांना वरिंदरच्या समस्येची जाणीव झाली तेव्हा त्याने पूजाच्या वडिलांचा तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. ते आनंदी झाले.

फेऱ्या मारल्यानंतर अब्दुल यांनी आपल्या पत्नीसोबत केले कन्यादान

‘जेव्हा वराच्या बाजूने मला पूजाच्या पालकांबद्दल विचारले गेले, तेव्हा मी वरींदरशी बोललो. तेव्हा त्या लोकांना येण्याची परवानगी मिळत नाही असे समजले. मी लग्नाची सर्व तयारी केली. मच्छिवाडा येथून ब्राह्मणाला बोलावले. हिंदू पद्धतीच्या सर्व विधी केल्या. फेरेही केले. कन्यादानच्या वेळी मी आणि माझी पत्नी सोनीसह आम्ही कन्यादान देखील केले’, अशी माहिती अब्दुल यांनी दिली.

मुस्लिम कुटुंबियांनी पूजाला भेटवस्तूही दिल्या

अब्दुल यांनी पत्नीसमवेत वरपक्षाकडील मंडळींसाठी जेवण बनवले. इतकेच नाही तर त्याने पूजाला भेट म्हणून डबल बेड्स, कपाटं आणि भांडीसुद्धा दिली. पूजा आम्हाला मामा-मामी म्हणते असे अब्दुल म्हणाले. ‘आम्ही गेल्या पाच वर्षांपासून वरींदरच्या कुटुंबाला ओळखतो. पूजा आम्हाला मामा-मामी म्हणते, म्हणून लग्नात आम्हाला काही कमी ठेवण्याची नव्हती. आम्ही जमेल तसे सर्व केले. पूजाच्या वडिलांनीही तिला काही पैसे पाठवले, अशी माहिती अब्दुल यांनी दिली.

वधु-वरासह ११ लोक झाले सहभागी

पूजाला अब्दुल यांच्या पत्नी सोनी या आपली मुलगीच मानतात. म्हणून तिला तिच्या लग्नात कोणतीही कमतरता सोडू देऊ नये, असे सोनी यांना वाटत होते. तथापि, लॉकडाउन आणि कडक नियमांमुळे हे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले. लग्न सोहळ्यात या चार जणांव्यतिरिक्त वराच्या दोन बहिणी त्यांचे पती आणि मुले सहभागी झाले होते. वराच्या पक्षाने वधुकडील मंडळींकडे काही मागितले नाही. मात्र, त्यांना पूजाची घरातून रिकाम्या हाताने पाठवणी करणे योग्य वाटले नाही. म्हणून अब्दुल यांच्या कुटुंबाने तिला भेट आणि काही रुपये दिले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Katrina Kaif Covid-19 Test Before Shoot Watch Video – कतरिना कैफने शेअर केली तिची करोना टेस्ट, लवकर सुरू करणार शूटिंग

मुंबई- करोना व्हायरसचा वाढा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या काळात जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. सिनेसृष्टीतही यातून सुटली नाही. अनेक निर्बंधासह शूटिंगचं काम तातडीने बंद...

Recent Comments