Home विदेश Myanmar landslide: मृत्यू तांडव: खाणीतील भूस्खलनात ११३ जण ठार; मृतांची संख्या वाढण्याची...

Myanmar landslide: मृत्यू तांडव: खाणीतील भूस्खलनात ११३ जण ठार; मृतांची संख्या वाढण्याची भीती – myanmar landslide at least 113 die in jade mine


रंगून: म्यानमारमधील कचिन प्रांतात काळाने कामगारांवर घाला घातला आहे. मुसळधार पावसामुळे जमीन खचल्यामुळे ११३ कामगारांचा मृ्त्यू झाला आहे. ढिगाऱ्यात अजूनही काही कामगार अडकले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक अधिकारी टार लिन माउंग यांनी सांगितले की, आतापर्यंत १०० हून अधिकजणांचे मृतदेह आढळले आहे. अनेक मृतदेह चिखलात अडकले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील एक आठवड्यापासून या भागत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. हे कामगार जेडच्या खाणीत काम करत होते. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलन झाले असल्याचे म्हटले जात आहे.

वाचा: भारताशी वाकडं घेणारे नेपाळचे पंतप्रधान राजकीय संकटात!

याआधीदेखील जेडच्या खाणीत भूस्खलनामध्ये अनेकजणांचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, अचानकपणे डोंगरावरील मातीचा ढिगारा खाली आला. त्याच्यामध्ये शेकडो कामगार अडकले गेले. ढिगाऱ्यात अडकलेल्या कामगाराच्या बचावासाठी तात्काळ प्रयत्न करण्यासाठीही कोणी नसल्याचे त्याने सांगितले. म्यानमारमध्येही एक वर्षापूर्वी असाच अपघात झाला होता. या अपघातामध्ये ५९ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ढिगाऱ्यात अडकल्यामुळे शेकडो कामगार जखमी झाले होते.

वाचा: चीनची चहुबाजूने कोंडी!; अमेरिका, ब्रिटनसह २७ देश एकवटले

जेडचा दगड हिरव्या रंगाचा असून त्याचा वापर दागिन्यांमध्ये करण्यात येतो. म्यानमारमध्ये जेडची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. अब्जावधी डॉलरची कमाई जेडच्या विक्रीतून केली जाते. उत्तर म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्ती आढळते. यामध्ये सोने, लाकूड, जेड आदी खनिजे धातू आढळतात.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments