Home महाराष्ट्र Nagpur: सासरच्यांकडून छळ; मायलेकीची अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या - nagpur mother...

Nagpur: सासरच्यांकडून छळ; मायलेकीची अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या – nagpur mother and daughter committed suicide in ambazari lake


म.टा. प्रतिनिधी, नागपूर: घरगुती वादाला कंटाळून मायलेकीने अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली. सविता राजू खंगार (वय ४५) आणि रूचिता राजू खंगार (वय २०,रा. दोघी वाठोडा ले आउट, विद्यानगर) अशी या मृतांची नावे आहेत.

सविता आणि तिची मुलगी रुचिता यांनी घरगुती वादातून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. या दोघींना त्यांच्या कुटुंबीयांकडून विशेषत: सविताच्या सासरच्यांकडून त्रास होता, असे सांगितले जाते. या दोघी घरातील पंखा दुरुस्त करू न शकल्याने कुटुंबीयांनी त्यांचा छळ केल्याचे कळते व हीच घटना आत्महत्येमागील निमित्त ठरल्याचे सांगितले जात आहे.

मुलीची हाकही थांबवू शकली नाही

या घटनेमुळे सविता आणि त्यांची लहान मुलगी रुचिता या रागाच्या भरात घरातून निघाल्या. सविता यांची मोठी मुलगी श्वेतलसुद्धा त्यांच्या मागोमाग निघाली. श्वेतल त्यांना रस्त्यात समजाविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र या दोघींच्या रागाचा पारा इतका वाढला होता की त्या घरापासून तब्बल १० किलमीटरचे अंतर पायी पार करून अंबाझरी तलावाजवळ पोहोचल्या. श्वेतलने अनेकदा समजाविण्याच्या प्रयत्न करूनही या दोघींनी जलसमाधी घेतली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

ठाण्यातील ‘त्या’ हत्येचे गुजरात कनेक्शन; २० वर्षांनंतर…

पहाटेची वेळ, अख्खं कुटुंब साखरझोपेत होतं; त्याचवेळी घडलं भयानक हत्याकांड

नगरमध्ये गोदामावर छापा; घबाड पाहून पोलीसही चक्रावले, रात्री उशिरापर्यंत मोजणी

काहीतरी मोठं घडतंय; पुन्हा लष्कराच्या हद्दीत घुसण्याचा २ तरुणांचा प्रयत्नSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Municipal Corporation: १५ हजार फेरीवाल्यांचा मार्ग मोकळा – 15,000 hawker will be allotted seats through lottery in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई फेरीवाला धोरणात मुंबईत ४०४ ठिकाणी ३० हजार ८३२ फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पात्र...

Panvel Municipal Corporation: सभापतिपदावर दरवर्षी नवे चेहरे – santosh shetty selected as chairman of panvel municipal corporation standing committee

म. टा. वृत्तसेवा, पनवेलपनवेल महापालिकेच्या बुधवारी पार पडलेल्या सभापतिपदाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या पदावर अखेर संतोष शेट्टी यांची निवड झाली. महिला व बालकल्याण सभापतिपदी कळंबोलीतून...

डबल बेलनंतर लाल परी घेतेय वेग

म. टा. वृत्तसेवा, करोनामुळे ओढावलेल्या लॉकडाउनमध्ये रुतलेली ची चाके अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू रुळावर येत आहेत. येथील मालेगाव आगारातील देखील आता...

Recent Comments