Home महाराष्ट्र Nagpur Central Jail: 'हे' कारागृह ठरतेय करोनाचा नवा हॉटस्पॉट; २४ तासांत ३३...

Nagpur Central Jail: ‘हे’ कारागृह ठरतेय करोनाचा नवा हॉटस्पॉट; २४ तासांत ३३ जणांना बाधा – 33 more test positive in nagpur central jail


म. टा. प्रतिनिधी, नागपूरः विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लागू झालेली टाळेबंदी जसजशी सैल होत आहे, तस तसा विषाणूचा विळखा वाढतच चालला आहे. सुरुवातीला सतरंजीपुरा, मोमिनपूरा नंतर नाईक तलावाजवळील बांग्लादेश वस्तीत विषाणूने ठोकलेला मुक्काम आता मध्यवर्ती कारागृहाकडे वळविला आहे. आज दिवसभरात करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या ३३ जणांपैकी १२ जण हे मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान आहेत. त्यामुळे आतापर्यंत करोनाचा विळखा पडलेल्यांची नागपुरातील संख्या १६११ वर पोचली आहे.

यापैकी आतापर्यंत १२७३ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी सोडण्यात आले. तर विषाणूचा विळखा पडल्यानंतर आजवर २५ जणांचा मृत्यू ओढवला. एकूण रुग्णांच्या संख्येतून हा आकडा वगळला तर सध्याच्या स्थितीत ३१३ करोनाबाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पुण्याने गाठला २५ हजारचा टप्पा; आकडा फुगण्याचे ‘हे’ आहे कारण

करोनाचा नव्याने विळखा पडलेल्यांमध्ये सुरुवातीला १९ जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यांमध्ये विषाणूचा अंश सापडला. यातले व्हिएनआयटीच्या विलगीकरण केंद्रातून पाठविलेले ६ नमुने माफ्सूच्या प्रयोगशाळेकडून, ४ मेयोच्या प्रयोगशाळेकडून, तर मेडिकलमधून ५, लतामंगेशकर रुग्णालयातून एक आणि ३ नमुने खासगी लॅबमध्ये तपासले गेले.
मेयोत पॉझिटिव्ह आलेल्या ४ नमुन्यांत २ काटोल येथील तर प्रत्येकी एक तमिळनाडूचा रहिवासी तर दुसरा रवि नगरातील बांधकाम विभागाच्या निवास संकुलातील रहिवासी आहे. दुपारच्या सत्रात यात आणखी १९ जणांची वाढ झाली. खासगी आणि मयोच्या प्रयोगशाळेतून प्रत्येकी १ नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर निरीच्या प्रयोगशाळेने तपासलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातील संशयितांपैकी १२ जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यांमध्ये करोनाचा अंश सापडला.

ठाण्यात करोनाचा विळखा घट्ट, कल्याण-डोंबिवलीमध्ये उच्चांकी ५६० रुग्णांची नोंद

आतापर्यंत ६६ बंदिवानांना विळखा

अकोला मध्यवर्ती कारागृहानंतर आता करोनाने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील प्रवेश केला आहे. या विषाणू प्रादुर्भावाच्या साखळीला एका रुग्णापासून सुरुवात झाली. त्यानंतर ९, ४४ आणि गुरुवारी १२ अशा नव्या बाधितांची भर पडल्याने आतापर्यंत करोना बाधितांची संख्या ६६ झाली आहे.

दैनिक संशयित- ३९६
एकूण संशयित: १८९४
सध्या भरती संशयित- ३१४
एकूण भरती संशयित- ५०२७
भरती पॉझिटिव्ह- २७९
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने: १६०९
दैनिक तपासणी नमूने – ४७१
एकूण तपासणी नमुने- २५५६५
घरी सोडलेले पॉझिटिव्ह: १२७३
एकूण डिस्चार्ज संशयित- ४४५५
आज अलगीकरण केलेले संशयित- ४८
घरी पाठविलेले संशयित: ९४
अलगीकरणातून रुग्णालयात पाठविलेले संशयित-१६
पाठपुरावा सुरु असलेले एकूण संशयित: २६३Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

trp scam case: टीआरपी घोटाळा : ‘रिपब्लिक’च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स – trp scam case : crime branch special squad summons to five republic tv...

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रिपब्लिक टीव्हीच्या पाच गुंतवणूकदारांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स जारी...

Recent Comments