Home शहरं नागपूर Nagpur crime: संतापजनक! सावकाराने शेतकरी महिलेला केली मारहाण, शेती बळकावली - money...

Nagpur crime: संतापजनक! सावकाराने शेतकरी महिलेला केली मारहाण, शेती बळकावली – money lender and his wife beaten to farmer woman in nagpur


नागपूर : व्याजाने दिलेले पैसे न मिळाल्याने तसेच शेती हडपण्यासाठी सावकाराने पत्नीच्या मदतीने एका शेतकऱ्याच्या पत्नीला जबर मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सावकार व त्याच्या पत्नीविरुद्ध मारहाण, विनयभंगासह महाराष्ट्र सावकारी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

उमरेड येथील अभय पाटील आणि प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवापूरमधील ३५ वर्षीय शेतकऱ्याने २०१७मध्ये अभय पाटीलकडून दोन लाख रुपये घेतले. यामोबदल्यात शेतकऱ्याने शेतीचे दस्तऐवज गहाण ठेवले. याचदरम्यान पाटील याने बनावट दस्तऐवजाद्वारे शेती नावे करून घेतली. सहा महिन्यांनी शेतकरी पैसे परत देण्यासाठी पाटील याच्याकडे गेला. त्याने पैसे घेण्यास नकार देत शेतीवर हक्क सांगितला. त्यानंतर पाटील हा शेती बळकाविण्याचा प्रयत्न करू लागला. मंगळवारी दुपारी शेतकऱ्याची पत्नी शेतात काम करीत होती. पाटील दाम्पत्य तेथे गेले. त्यांनी शेतकऱ्याच्या पत्नीला मारहाण केली. तिचा विनयभंग केला. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून भिवापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

खळबळजनक! तरुणाला नग्न करून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! ऑनलाइन क्लासला कंटाळून ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: kangana ranaut : शिवसेना नेत्यांकडून जिवाला धोका, कंगनाची सुप्रीम कोर्टात धाव – kangana ranaut in supreme court seeking transfer criminal cases

नवी दिल्लीः मुंबईत दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत ( kangana ranaut ) आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी आता सुप्रीम कोर्टात...

nashik onion growers: कुठे घसरला, तर कुठे वधारला – onion price decline in pimpalgaon, lasalgaon and onlion price increased in manmad and nandgaon

टीम मटागेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कांदादराबाबत चढउतार अनुभवास येत आहेत. सोमवारी पिंपळगाव, लासलगावात कांदादरात ३०० रुपयांची घसरण झाली तर, येवला मनमाड, नांदगावात मात्र...

शेकडो संस्था सभासदत्वाविना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या पंचवीस वर्षांपासून आलटून पालटून काही अंशी बिनविरोध करून तेच तेच संचालक आजपर्यंत कायम असून,...

Recent Comments