Home शहरं नागपूर nagpur man death: दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझर प्यायला अन् जीव गमावला...

nagpur man death: दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझर प्यायला अन् जीव गमावला – nagpur man died after consuming hand sanitizer as an alternative for liquor


नागपूर : सॅनिटायझर प्यायल्याने महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. गंगाबाई घाट परिसरातील गुजरनगर भागात ही घटना घडली. गौतम बिसेन गोस्वामी (वय ४५) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हे महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होते. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाबाई घाट परिसरातील गुजरनगर भागात ते राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. २१ जून रोजी दारू न मिळाल्याने ते सॅनिटायझर प्यायले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

करोना संकटाच्या काळात लोक आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. करोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आणि खबरदारी घेत आहेत. मात्र, नागपूरमध्ये घडलेल्या घटनेने सगळेच हादरले आहेत. दारू मिळाली नाही म्हणून गौतम हे सॅनिटायझर प्यायले आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागू केल्याने या काळात दारुची दुकाने बंद होती. त्यामुळे दारू मिळत नव्हती. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्याने दारुची तलफ भागवण्यासाठी काही जण सॅनिटायझर पिऊ लागल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. नागपुरात सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

महापालिकेत स्वच्छता कर्मचारी होते…

नागपूर महापालिकेत स्वच्छता कर्मचारी असलेले गौतम हे दारू न मिळाल्याने दारूची तलफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्यायले. सॅनिटायझर प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाला. २१ जून रोजी ते दारू न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायले होते. तब्येत बिघडल्याने गौतम यांच्या नातेवाइकांनी त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, पुन्हा दोन दिवस प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्याची ही नागपुरातील पहिलीच घटना आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसांनी नोंद केली असून, पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. दारूऐवजी नशेसाठी सॅनिटायझर पिणाऱ्या अजून कोण व्यक्ती आहेत, याचाही तपास केला जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

KXIP vs DC Excellent Bowling From Ashwin To Get The Wicket Of Dangerous Universal Boss – आधी फलंदाजाच्या बुटाची लेस बांधून दिली, मग बोल्ड...

दुबई: आयपीएलमध्ये काल झालेल्या ३८व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्लीने विजयासाठी दिलेले १६५ धावांचे लक्ष्य पंजाबने १९व्या षटकात ५...

atul todankar in hungama 2: अभिनेता अतुल तोडणकर करणार ‘हंगामा’; दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत – marathi actor atul todankar share his experience working in hungama...

मुंबई : प्रियदर्शन सोमण नायर यांचा 'हंगामा' हा चित्रपट २००३ साली आला होता. त्यानंतर त्याचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हंगामा २'मध्ये...

Rajesh Tope News: Coronavirus Health Workers Will Be Vaccinated First Says Rajesh Tope – Rajesh Tope: राज्यात सर्वात आधी करोनाची लस कुणाला?; टोपेंनी केले...

मुंबई:करोना महामारीने जगभरात चित्र बदलले असून आयसीएमआर कडून लस आल्यावर पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे...

Recent Comments