आरती व बंडू शेजारी राहतात. मोपेड पार्क करण्यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. बुधवारी आरती यांनी मोपेड पार्क केली. बंडू याने त्यांच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला गेला. त्यामुळे बंडू संतापला. त्याने चाकूने आरती यांच्या हातावर, खांद्यावर, छातीवर व पोटावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात आरती खाली कोसळल्या व त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून बंडू पसार झाला. नागरिकांची तिथे गर्दी जमली. एका नागरिकाने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांदीपन पवार यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून आरती यांचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी शोध घेऊन बंडू याला अटक केली. आरती यांचे पती नितीन यांचा डीजेचा व्यवसाय आहे. बंडू हा वाहनचालक आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत.
मुंबई: अल्पवयीन मुलीला शेजाऱ्यानं बळजबरी केला किस; ५ वर्षे कारावास
धक्कादायक! ऑनलाइन क्लासला कंटाळून ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या