Home शहरं नागपूर nagpur murder: थरार! दुचाकी पार्क करण्यावरून वाद; चाकूने वार करून महिलेची हत्या...

nagpur murder: थरार! दुचाकी पार्क करण्यावरून वाद; चाकूने वार करून महिलेची हत्या – woman murdered quarrel over motorcycle parking in nagpur


नागपूर: क्षुल्लक कारणावरून तरुणाने चाकूने सपासप वार करून महिलेची हत्या केली. ही थरारक घटना नंदनवन झोपडपट्टीतील गल्ली क्रमांक ५ येथे बुधवारी रात्री घडली. आरती नितीन गिरडकर (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी तरुणाला अटक केली. बंडू ऊर्फ एकनाथ प्रेमराज टापरे (वय २९) असे अटक केलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे.

आरती व बंडू शेजारी राहतात. मोपेड पार्क करण्यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. बुधवारी आरती यांनी मोपेड पार्क केली. बंडू याने त्यांच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला गेला. त्यामुळे बंडू संतापला. त्याने चाकूने आरती यांच्या हातावर, खांद्यावर, छातीवर व पोटावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात आरती खाली कोसळल्या व त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून बंडू पसार झाला. नागरिकांची तिथे गर्दी जमली. एका नागरिकाने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांदीपन पवार यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून आरती यांचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी शोध घेऊन बंडू याला अटक केली. आरती यांचे पती नितीन यांचा डीजेचा व्यवसाय आहे. बंडू हा वाहनचालक आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत.

मुंबई: अल्पवयीन मुलीला शेजाऱ्यानं बळजबरी केला किस; ५ वर्षे कारावास

धक्कादायक! ऑनलाइन क्लासला कंटाळून ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : एनसीबीचे आरोपपत्र – sushant singh rajput death case : first charge sheet has filed in sushant...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करत असतानाच त्यात काही व्हॉट्सअॅप संभाषणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे रॅकेट उजेडात आल्याने नार्कोटिक्स...

Recent Comments