Home शहरं नागपूर nagpur murder: नागपूरमध्ये थरार; गुंडांनी पाठलाग करून तरुणाला हातोड्याने ठेचून मारले -...

nagpur murder: नागपूरमध्ये थरार; गुंडांनी पाठलाग करून तरुणाला हातोड्याने ठेचून मारले – 32 year old man murdered by criminals in nagpur


नागपूर: कुख्यात गुंडांनी हातोड्याने वार करून सुरेंद्र सुखदेव तभाने (वय ३२) याची हत्या केली. ही थरारक घटना गुरूवारी दुपारी साईबाबानगर भागात घडली. या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

शांतीनगर पोलिसांनी कलवा ऊर्फ दीपक सोनी, शेख जलील ऊर्फ बावा पन्नी शेख साबिर व त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जुगार व दारूच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे. सुरेंद्र हा गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. कलवा व बावा पन्नी कुख्यात गुन्हेगार असून पाच वर्षांपूर्वी कलवा याने अल्पवयीन मुलीवर शाळेच्या परिसरात अत्याचार केला होता. गुरुवारी दुपारी सुरेंद्र, पन्नी, कलवा व त्यांच्या दोन साथीदारांनी दारू प्यायली. यादरम्यान सुरेंद्रचा बाबा पन्नीसोबत वाद झाला. सुरेंद्रने पन्नीला मारहाण केली. त्यामुळे कलवाने सुरेंद्रला मारहाण सुरू केली. पन्नीच्या तावडीतून सुटका करून सुरेंद्र तेथून पळाला. पन्नी, कलवा व त्याच्या साथीदारांनी सुरेंद्र याचा पाठलाग केला. चौघांनी घरासमोरच सुरेंद्रला गाठले. हातोड्याने त्याच्या डोक्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सुरेंद्र खाली पडला. त्याचा मृत्यू झाला. मारेकरी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर व गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून सुरेंद्रचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संतापजनक! वाळू माफियांनी केला तहसीलदारांना ट्रकनं चिरडण्याचा प्रयत्न

धक्कादायक! ‘TikTok’ बघू दिलं नाही; मुलानं केली आत्महत्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला ठोकला रामराम

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

Deepali Sayed: Deepali Sayed: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी – mumbai man arrested for allegedly issuing threats to marathi actress deepali sayed

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) हिला बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या...

dislike on youtube video: नावडत्याचं मीठ अळणी! ‘डिसलाईक’ काही पंतप्रधानांची पाठ सोडेना – dislike on pm modis address to nation on bjp youtube channel...

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी ६.०० वाजता देशाला संबोधित करताना कोविड १९ संक्रमणाचा धोका अद्याप संपलेला नसल्याचं सांगतानाच नागरिकांना काळजी...

Recent Comments