Home शहरं नागपूर Nagpur News : अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्याविरुद्ध गुन्हे! - otherwise crimes against...

Nagpur News : अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्याविरुद्ध गुन्हे! – otherwise crimes against seed producing companies!


म.टा. वृततसेवा, यवतमाळ

यावर्षीच्या खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. मात्र, सोयाबीनचे बियाणे उलवलेच नाही, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन उत्पादक कंपन्यांनी बियाणे बदलवून द्यावे किंवा नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी दिला.

जिल्ह्यात न उगवलेल्या सोयाबीन बियाणांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, खासगी सचिव रवींद्र पवार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र घोंगडे तसेच बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात ९ लक्ष २ हजार हेक्टरपैकी जवळपास अडीच लक्ष हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते, असे सांगून राठोड म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे बियाणे पेरणीनंतर उगवले नाही, त्यांनी कृषी विभागाकडे बिलासह अर्ज दाखल करावा. महाबीजच्या धर्तीवर संबंधित कंपन्यांनी बियाणे बदलवून द्यावे किंवा स्वत:च्या सीएसआर फंडमधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. मात्र, असे न करणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी एफआयआरसुद्धा दाखल केला जाईल. यापुढे न उगवलेल्या बियाणांबाबत एकाही शेतकऱ्यांची तक्रार येता कामा नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी सिंह यांनी, सोयाबीन उत्पादक बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून माहिती घ्यावी. जिल्ह्यात विकलेल्या बियाणांपैकी किती टक्के बियाणांबाबत तक्रारी आल्या आहेत, याबाबत दोन दिवसांत माहिती सादर करा, अशा स्पष्ट सूचना दिल्या. बैठकीला सारस, इगल, ऋची, अंकूर, ग्रीनगोल्ड या सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccination in aurangabad: करोना लसीकरणासाठी ३७३ ठिकाणे निश्चित – municipal corporation has identified 373 places for vaccination

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनावरील आजारावरील लसीकरणासाठी महापालिकेने ३७३ ठिकाणे निश्चित केली आहेत. व्हॅक्सीनेटरची नावे देखील ठरविण्यात आली असून, ही सर्व माहिती पालिकेने शासनाला...

‘त्यांची’ झेप देहविक्रीकडून आत्मनिर्भरतेकडे

: ग्राहकाची वाट पाहणे हे व्यावसायिकाचे नशीबच असते. त्याला कुणीही अपवाद नाही, अगदी देहविक्रय करणाऱ्या महिलादेखील. परंतु, करोनासारख्या साथीमुळे 'सुरक्षित वावरा'चा नारा...

Recent Comments