Home शहरं नागपूर Nagpur News : आज वादळीपाऊस? - it's raining today?

Nagpur News : आज वादळीपाऊस? – it’s raining today?


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

अरबी समुद्रातील कमीदाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली असून, त्याचे रुपांतर ‘निसर्ग’ या चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ बुधवारी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. याचा परिणाम विदर्भावरही होणार असून, बुधवारी अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा, तर पूर्वविदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील बदलांमुळे गेल्या चार दिवसांपासून शहरात तसेच विदर्भात अचानक पावसाळी वातावरण तयार झाले आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेसुद्धा शहरात पाऊस झाला. मंगळवारी सकाळपासून अंधारून आले होते. सकाळी ९च्या सुमारास शहरात काही काळासाठी मुसळधार पाऊस झाला. दिवसभर ढगांचे साम्राज्य होते. संध्याकाळी ५नंतर काही काळापुरते आकाश नीरभ्र झाले. बुधवारी पश्चिमविदर्भात अतिवृष्टीचा, तर पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरातसुद्धा सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ही परिस्थिती ६ जूनपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.

पाऱ्यात घसरण

चार दिवसांपूर्वी शहरात उष्णतेची लाट होती. त्यानंतर अचानक बदलेल्या वातावरणामुळे पाऱ्यात बरीच घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत कमाल तापमानात सुमारे नऊ अंशांची, तर किमान तापमानात सुमारे पाच अंशांची घसरण झाली आहे. यामुळे सर्दी खोकल्याचे आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

…….Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘या’ इंडियन कंपनीने चीनच्या शाओमी-रियलमीला मागे टाकले

नवी दिल्लीः ऑडियो प्रोडक्ट्सचे मार्केट गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. भारतात ऑडियो वियरेबल्स खूप प्रसिद्ध आहे. इंडियन युजर्ससाठी नवीन स्मार्टफोन्स प्रमाणे ऑडियो प्रोडक्ट्सची...

Jameel Shaikh Case One Arrested By Thane Police Crime Branch – Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती

ठाणे: ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख (Jameel Shaikh Murder) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, रोज नवीन माहिती समोर येत आहे. शेख यांची...

International Flights Ban Till 31st December – आंतरराष्ट्रीय उड्डाणं ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, डीजीसीएचे निर्देश

नवी दिल्ली : करोना पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (DGCA) आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरची स्थगिती ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. नागरी उड्डाण महासंचालनालयानं दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरपर्यंत...

Recent Comments