Home शहरं नागपूर Nagpur News: आपण ही लढाई नक्कीच जिंकू... - we will definitely win...

Nagpur News: आपण ही लढाई नक्कीच जिंकू… – we will definitely win this battle …


डॉ. गिरीश ओक यांचा ‘लाइव्ह’ आशावाद

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

‘सध्या आपण करोनासारख्या विषाणूविरोधात लढाई लढतो आहोत. निसर्गाची हेळसांड केली, त्याच्याशी चुकीचे वागलो. त्याच निसर्गाने आपल्यावर हे संकट उभे केले आहे. पण, ज्याची प्रतिकारशक्ती चांगली असते, तोच ही लढाई जिंकतो. आपण भारतीय ही लढाई निश्चितपणे जिंकू’, असा आशावाद आयुर्वेदाचे डॉक्टर असलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी व्यक्त केला.

‘मटा कल्चर क्लब’च्या फेसबुक लाइव्ह उपक्रमांतर्गत शनिवारी डॉ. गिरीश ओक यांनी त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यांच्या मालिका, नाटक, लॉकडाउन, ते काय सध्या करतात आदींविषयी अनेक प्रश्न चाहत्यांनी त्यांना विचारले. मूळ नागपूरचे असलेल्या डॉ. ओक यांनी नागपूरच्या वास्तव्यातील अनेक आठवणी यावेळी ताज्या केल्या.

‘या लॉकडाउन काळात मी पत्नीला केर काढायला, भांडी घासायला, कपड्यांच्या घड्या घालायला मदत करतो. ती मला भांडी घासू देत नाही. तुला चांगली भांडी घासता येत नाहीत, असे ती म्हणते. कूकर लावणे, भाज्या चिरणे अशी कामेदेखील करतो’, असे डॉ. ओक म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या एका लोकप्रिय मालिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘निवेदिता सराफ आणि माझी केमिस्ट्री लोकांना आवडली. त्या खूप अनुभवी आहेत. खूप छान काम करतात. आमच्यासाठी घरून भरपूर खायलादेखील आणतात. सध्या या मालिकेचे शूटिंग बंद आहे. त्यामुळे कलाकारांशी भेट होत नाही. पण, लवकरच ही मालिका सुरू होईल, अशी आशा आहे.’

चाहत्यांनी त्यांना एखादे गाणे गायचा आग्रह केला तेव्हा त्यांनी ‘मी प्रोफेशनल गायक नाही, बाथरूम सिंगर आहे, गाणे आवडते, किशोर ककुमार, मो. रफी, तलत महमूद, जगजीतसिंग आवडते, जुने गायक आवडतात’, असे सांगितले. ‘चिवित्रा’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अभिवाचन लॉकडाउनच्या काळात युट्यूबवर करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपुरात त्यांची झालेली जडणघडण, कॉलेजच्या निवडणुका, संप, रास्ता रोको, त्यासाठी झालेली जेल, कॉलेजसाठी नाटक, एकांकिका स्पर्धामधून मिळवलेली पारितोषिके, झाडीपट्टी, गणपती उत्सवात केलेली नाटके, येथील पदार्थ, भाषा, टेकडीचा गणपती, सावजी जेवण, मित्र अशी सर्वांची आठवण येत असल्याचे ते म्हणाले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MNS morcha: पुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा मोर्चा, शहरप्रमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात – mns morcha on electricity bill pune city chief ajay shinde and...

पुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेच्या आंदोलनाआधीच पोलिसांनी शहरप्रमुख अजय शिंदे यांच्यासह ५०-६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. फरासखाना पोलीस ठाण्यात त्यांना घेऊन गेले. त्यामुळे आक्रमक झालेल्या...

corona infection from food: अन्नातून करोना संसर्ग; ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food but lack of concrete evidence says infectious diseases clinic...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून घरी...

Recent Comments