Home शहरं नागपूर Nagpur News : आमची होतेय फसवणूक - we are being deceived

Nagpur News : आमची होतेय फसवणूक – we are being deceived


आयुध निर्माणी मजदुरांचे आंदोलन; तीन दिवसांनंतर ‘बेमुदत’चा घेणार निर्णय

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

केंद्र सरकारने देशभरातील आयुध निर्माणीच्या निगमीकरणाचा (कॉर्पोरेटायजेशन) निर्णय घेतला आहे. याविरुद्ध अंबाझरी आयुध निर्माणीत भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वात एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कॉर्पोरेटायजेशनचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

चार वर्षांपूर्वी आयुध निर्माणीच्या कामात थेट परकीय गुंतवणुकीला मोकळीक देण्यात आली. त्यामुळे देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आयुध निर्माणीच्या कामात कपात झाली आहे. त्यानंतर आयुध निर्माणीत तयार होणाऱ्या अनेक वस्तूंची निर्मितीही खासगी कारखानदारांकडून करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हळूहळू आयुध निर्माणीचे काम बंद करीत, कर्मचारीही कमी करण्याचा डाव केंद्र सरकारकडून आखला जात आहे. अशातच करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. त्यामध्ये आयुध निर्माणीचे कॉर्पोरेटायजेशन करण्यात येईल. आयुध निर्माणी मंडळ लिस्टेड करण्यात येतील, अशी घोषणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा कामगारांनी आयुध निर्माणीच्या बदलत्या स्वरूपाला विरोध केला आहे.

याबाबत अधिक सांगताना आयुध निर्माणी मजदूर संघाचे पदाधिकारी हर्षल ठोंबरे म्हणाले, ‘सद्य:स्थितीत देशभरातील आयुध निर्माणींमध्ये एकूण ऐंशी हजार कामगार आहेत. तर अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये पाच हजार स्थायी तर दीड हजार कंत्राटी कामगार आहेत. या सर्वांच्या नोकरीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. निगमीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण होत आहे, ही कामगारांची फसवणूक आहे.’

बुधवारपासून तीन दिवस कामगारांचे मत जाणून घेण्यात येईल. त्यानंतर अनिश्चितकाळासाठी संप पुकारण्यात येणार आहे. यापूर्वी मागील वर्षी पाच दिवस संप पुकारण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय!

राज्यात ५० हजार कर्मचारी

देशभरात विविध राज्यांमध्ये एकूण ४१ आयुध निर्माणी कार्यरत असून, त्यापैकी सर्वाधिक दहा महाराष्ट्रात आहेत. राज्यातील तब्बल ५० हजार कर्मचारी यामध्ये काम करतात. याद्वारे तिन्ही सशस्त्र दले, सर्व निमलष्करी दले, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची पोलिस दले यांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे व दारूगोळा यांचा नियमित पुरवठा केला जातो.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : ‘स्मार्ट सिटी’साठी आणखी दीडशे कोटी – rs 150 crore more for ‘smart city’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून आणखीन १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. शासनाने दिलेल्या निधीच्या...

Pimpri Chinchwad: Pimpri chinchwad: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड – pimpri chinchwad man vandalised vehicles after his sister love marriage

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून अल्पवयीन भावाने १२ वाहनांची तोडफोड केली. तसेच हातात कोयता घेऊन परिसरात साथीदारांच्या मदतीने दहशत निर्माण...

Recent Comments