Home शहरं नागपूर Nagpur News : आरक्षित जलसाठ्यांत ८० टक्के पाणी - 80% water in...

Nagpur News : आरक्षित जलसाठ्यांत ८० टक्के पाणी – 80% water in reserved reservoirs


म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

गेल्या वर्षी उन्हाळ्यात प्रकल्प कोरडे झाल्याने मृत जलसाठा वापरावा लागला होता. यंदा सद्य:स्थिती प्रकल्प ८० टक्के भरलेले आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने पुढील वर्षी नागपूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे संकेत आहेत. जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी ही माहिती दिली.

या वर्षाचा उर्वरीत कालावधी व पुढील वर्षीही शहराला पाणीटंचाई भासणार नाही अशी माहिती झलके यांनी दिली. तोतलाडोह जलाशयाची क्षमता १२१७ दशलक्ष घनमीटर आहे. यंदा त्यात ८०८ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. पाण्याची टक्केवारी ७९.६४ आहे. नवेगाव खैरी येथील पाणी क्षमता ३४१ दशलक्ष घनमीटर आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ३७.८२ दशलक्ष घनमीटर साठा होता. आता त्यात ८७.३४ दशलक्ष घनमीटर साठा आहे. त्यामुळे नागपूरकरांना उर्वरीत उन्हाळा टंचाई जाणवणार नाही, असे सांगण्यात आले. यावर्षीसह पुढील वर्षीच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाई भासणार नाही अशी शक्यता तूर्तास व्यक्त होत आहे. पावसाळ्यात जलसाठ्यांत होणारी वाढ बघता ही शक्यता वर्तविण्यात यत आहे. शहरातील ‘नेटवर्क’ भागांत गेल्यावर्षी १०५ पाणीटँकर होते. यंदा हा आकडा ७५वर आला आहे. शहराच्या बाह्य भागातील वस्त्यांसाठी ‘नॉन नेटवर्क’ भागांत गेल्यावर्षी ३४६ पाणीटँकर होते. यावर्षी ही संख्या २२६ आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Recent Comments