Home शहरं नागपूर Nagpur News: उद्योगांना आजपासून प्रारंभ - businesses start today

Nagpur News: उद्योगांना आजपासून प्रारंभ – businesses start today


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

महिनाभरापासून असलेल्या लॉकडाउनमुळे ठप्प असलेले उद्योग सोमवारपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. महापालिका हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतीत असलेल्या उद्योगांना सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असली तरी यासाठी काही नियमावली ठरवून दिली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील केवळ १० ते १५ टक्के उद्योग सुरू होण्याची शक्यता आहे.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसला. उद्योग ठप्प होण्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर झाल्याने अखेर महिनाभराच्या कालावधीनंतर केंद्र व राज्य सरकारने उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, महापालिका हद्दीच्या बाहेर असलेल्या उद्योगांनाच ही परवानगी देण्यात आली आहे. यासाठी उद्योगांनानियामवली निश्चित करून देण्यात आली आहे. त्यामुळे या नियमावलींचे पूर्ण पालन केल्यानंतर जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा या प्रमुख वसाहतीसह इतर औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू होणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला ही सर्व नियमावली प्राप्त झाली आहे. मात्र, असे असले तरी लॉकडाउननंतर मोठ्या संख्येने कामगार त्यांच्या गावी परतले आहेत. अनेक कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आहेत. त्यातच प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या उपाययोजना करण्यासाठी उद्योगांना काही अवधी लागणार आहे. त्यामुळे १० ते १५ टक्केच उद्योग सुरू होण्याची शक्यता आहे. पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिसएशनचे माज़ी अध्यक्ष व उद्योजक नितीन लोणकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

काय आहे नियमावली

-यात करोना हॉटस्पॉटच्या भागातील किंवा त्यासाठी सील करण्यात आलेल्या भागातील कामगार व कर्मचाऱ्यांना कामावर प्रवेश देता येणार नाही.

-औद्योगिक परिसरातील प्रवेशद्वार, कॅफेटेरिया, सभागृह, प्रसाधनगृहे यांचे नियमितपणे निजर्तुंकीकरण करणे गरजेचे राहील.

-कामाच्या ठिकाणी असलेल्या पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेत बदल करून त्याऐेवजी फूट टॅप्स लावणे अनिवार्य असेल.

– कामाच्या ठिकाणी कामगारांना आणण्यासाठी कामगारांसाठी विशेष वाहनांची व्यवस्था करावी लागेल. तसेच एकूणवाहन क्षमतेच्या ३० ते ४० टक्केच कामगारांना बसण्याची परवानगी देण्यात येईल.

-कामगारांसाठी औद्योगिकवसाहतीच्या नजिकच्या परिसरातच राहण्याची व्यवस्था करणे अनिवार्य राहील, कारखान्यात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करावे लागेल.

-दोन शिफ्टमध्ये किमान तासभराचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील.

सुरू होण्यापूर्वीच आव्हाने

तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर उद्योगांना सुरू होण्याची परवानगी मिळाली असली तरी यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेली स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे (एसओपी) पालन केल्यानंतरच उद्योगांना कामकाज सुरू करता येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेत बदल करून फूट टॅप्स, कामगारांसाठी निवासाची व्यवस्था अशा अनेक सोयीसुविधांची निर्मिती करण्याचे मोठे आव्हानही उद्योगांना पेलावे लागणार आहे. एकीकडे उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी यात येणाऱ्या अडचणी नेमक्या सुरू झाल्यावर कळणार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

……

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Tamil Nadu Lockdown Extended Till 31 March – Tamil Nadu : तामिळनाडूत लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ | Maharashtra Times

हायलाइट्स:तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी ६ एप्रिल रोजी मतदानलॉकडाऊन निर्बंध कडक करण्याचा राज्य सरकारचा निर्णयतामिळनाडूमध्ये येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनचेन्नई :तामिळनाडू विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या...

मोबाइल हिसकावणाऱ्या दोघांना पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, घराकडे परतत असणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी रविवारी दोन जणांना अटक केली. दोघा आरोपींना सोमवारपर्यंत (एक मार्च) पोलिस...

redmi note 10 smartphone: Redmi Note 10 स्मार्टफोन ४ मार्चला होणार लाँच, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत हे फीचर्स मिळणार – redmi note 10...

हायलाइट्स:Redmi Note 10 स्मार्टफोन ४ मार्चला होणार लाँच३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत हे फीचर्स मिळणार 33 वॉट फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीनवी दिल्लीःRedmi...

Recent Comments