Home शहरं नागपूर Nagpur News: एकामुळे ४० संक्रमित - 1 infected due to acne

Nagpur News: एकामुळे ४० संक्रमित – 1 infected due to acne


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

करोना विषाणूंच्या प्रादुर्भावाचा तांडव सुरू असलेल्या नागपुरातील सतरंजीपुरासाठी सुटीचा दिवस ‘काळा रविवार’ ठरला. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात आणखी नऊ जणांना करोनाची बाधा झाल्याचे रविवारी प्राप्त नमुन्यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे आता नागपुरातील करोनाबाधितांच्या संख्येने ६३ वरून थेट ७२ वर उसळी घेतली. यातील नागपूरसाठी सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, करोनाची लागण झालेल्या एकूण ७२ रुग्णांपैकी जवळजवळ ४० जण हे उपचारादरम्यान मेयोत दगावलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आल्याने बाधित झाले आहेत. एकाच व्यक्तीमुळे इतक्या मोठ्या संख्येने करोनाची लागण होण्याचा हा बहुधा देशातील उच्चांकी आकडा आहे.

करोनाच्या चाचणीत रविवारी पॉझिटिव्ह आलेले बहुतांश जण हे सतरंजीपुरा, मोमिनपुरा, शांतीनगर आणि कुंदनलाल गुप्तनगरातील रहिवासी आहेत. यातील काही जण बाधित रुग्णाचे नातेवाईक, शेजारी आहेत. हा रुग्ण आजारपणामुळे घरातच असताना हे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी घरी गेले असता त्याच्या सहवासात आले होते. त्यामुळे करोनाची लागण होण्याची शक्यता पाहता, या सर्वांना आमदार निवासातल्या सक्तीच्या एकांतवास कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने शनिवारी रात्री इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. यात नऊ जणांच्या घशातील द्रवामध्ये करोना विषाणूचा अंश आढळला.

हे आहेत नवे पॉझिटिव्ह…

मेयोच्या प्रयोगशाळेने शनिवारी रात्री तपासलेल्या घशातील द्रवाच्या नमुन्यांमध्ये करोनाचा अंश आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यापैकी १३, २९, ३३, ३५ आणि ३६ वर्षीय महिलांचा समावेश आहे. तर रविवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये १३, १५, ३३, ३५ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

कुंदनलाल गुप्तनगर सील

या घडामोडीत रविवारी करोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या ९ जणांपैकी दोन जण सतरंजीपुराला लागून असलेल्या शांतीनगरातील आहेत. तर काही जण हे कुंदनलाल गुप्तनगरातील रहिवासी आहेत. त्यामुळे करोनाची लागण झालेल्या भागात नवे ठिकाण जोडले गेले आहे. शहरात आधी बजाजनगर, नंतर अभ्यंकरनगर, खामला, जरीपटका, एम्प्रेस सिटी, सतरंजीपुरा, मोमिनपुरा, शांतीनगर, गिट्टीखदान भागात करोना प्रादुर्भावाची साखळी सुरू झाली होती. त्यात आता कुंदनलाल गुप्त नगरची भर पडली. त्यामुळे या नव्या बाधिताच्या सहवासात आलेल्यांची साखळी शोधण्यासाठी प्रशासनाने तडकाफडकी हा परिसर सील केला आहे.

नागपूरचा आढावा……

दैनिक संशयित : ५६

एकूण संशयित : १,१२९

सध्या भरती संशयित : ८८

एकूण भरती संशयित : १,१९०

एकूण भरती सकारात्मक रुग्ण : ५९

दैनिक तपासणी नमुने : ६२

एकूण तपासणी नमुने : १,६४७

आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने : ७२

घरी सोडलेले सकारात्मक रुग्ण : १२

घरी सोडलेले संशयित : १,१०१

आज अलगीकरण केलेले संशयित : २७

अलगीकरण कक्षात भरती संशयित : ५७३

अलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले संशयित : २७

अलगीकरण कक्षातून रुग्णालयात पाठविलेले संशयित : ९

पाठपुरावा सुरू असलेले एकूण संशयित : ४६८

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Arnab Goswami: हक्कभंग समितीचे अर्णब गोस्वामींना समन्स; ‘हे’ आहे कारण – legislative assembly violation committee sommones to arnab goswami

टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीत अडचणीत आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना विधानसभेच्या हक्कभंग समितीने समन्स बजावले आहे.  Source link

Mumbai Coastal Road Project: ‘किनारी मार्ग’ वेगात – mumbai coastal road project :100 meters of underground tunnel dug in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या किनारी मार्गाने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 'मावळा' या टीबीएम मशिनने खणल्या...

Recent Comments