Home शहरं नागपूर Nagpur News : ओडिशाला जाणाऱ्या बसमध्ये श्रमिकाचा मृत्यू - worker dies in...

Nagpur News : ओडिशाला जाणाऱ्या बसमध्ये श्रमिकाचा मृत्यू – worker dies in odisha bus


नागपूर : सुरतहून ओडिशाला जाणाऱ्या बसमध्ये (जीजे-०२-वाय५४५७) २७वर्षीय श्रमिकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास बेलतरोडी पोलिस स्टेशन हद्दीतील पांजरी टोलनाका येथे उघडकीस आली. कृष्णा रामेश्वर बिसोई (रा. ओडिशा) असे मृताचे नाव आहे. शनिवारी सुरत येथे अडकलेल्या ६० श्रमिकांना घेऊन बस ओडिशाकडे जात होती. दुपारी बस पांजरी टोलनाक्याजवळ थांबली. यावेळी कृष्णा बसमध्येच झोपून होता. अन्य श्रमिकांनी त्याला आवाज दिला. कृष्णाला जाग आली नाही. दरम्यान, टोलवरील कर्मचाऱ्याने बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. पथक तेथे पोहोचले. डॉक्टरलाही बोलाविण्यात आले. डॉक्टरने तपासून कृष्णाला मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

तपासणीपर्यंत नागपुरातच

कृष्णाची करोना तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने अन्य श्रमिकांना पुढील प्रवासासाठी ओडिशाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Subodh Bhave Post For Gayatri Datar On Instagram See Funny Comment – ‘सेटवर कसा असतो गायत्री सोबतचा सीन’ सुबोध भावेच्या गंमतीशीर पोस्टवर कमेंटचा पाऊस...

हायलाइट्स:गायत्री दातारनं सुबोध भावेच्या 'तुला पाहते रे' या मालिकेतून केलं होतं अभिनय क्षेत्रात पदार्पणसुबोध भावेनं गायत्रीसाठी लिहिली गंमतीशीर पोस्टसुबोध भावेच्या पोस्टवर चाहत्यांच्या धम्माल...

mhada authority: म्हाडाची प्रीमियम कपात केवळ २५ टक्के – mhada authority writes letter to maharashtra government over development premium

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या साथीने गृहनिर्माण क्षेत्राला दिलेल्या दणक्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने विकासकांना प्रीमियम शुल्कात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्यानुसार राज्यातील...

Recent Comments