Home शहरं नागपूर Nagpur News : कंटेन्मेंट झोनमधुन बाहेर काढा - get out of the...

Nagpur News : कंटेन्मेंट झोनमधुन बाहेर काढा – get out of the containment zone


म.टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर

अंबाझरी परिसरातील ट्रस्ट ले-आऊट येथील एक व्यक्ती करोना संक्रमित आढळल्यानंतर कंटेन्मेंट झोनच्या यादीत टाकण्यात आलेल्या या परिसराला तातडीने प्रतिबंधमुक्त करावे, या मागणीसाठी शनिवारी सकाळी नागरिक रस्त्यावर उतरले. आमदार विकास ठाकरे यांनी नागरिकांच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवित या परिसरातील व्यवहार सुरळीत करावे, अशी मागणी केली.

या भागात करोनाबाधित आढळल्यानंतर संपूर्ण परिसराला टीनाचे कुंपण उभारण्यात आले होते. त्यानंतर हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आला होता. गेल्या १५ दिवसांत या परिसरातील नागरिकांच्या चाचण्या निगेटिव्ह येत आहेत. त्यानंतरही परिसर सील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन वस्तूही मिळत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिक शनिवारी रस्त्यावर उतरले. या भागाचे आमदार विकास ठाकरे यांनीही त्यांना पाठिंबा दिला. २२ मे २०२०पर्यंत हा परिसर मनपाने कंटेन्मेंट झोन म्हणून सील ठेवला आहे. मुदत संपल्यानंतरही प्रतिबंध कायम असल्याने व नागरिकांच्या चाचण्या निगेटीव्ह येत असतानाही आदेशांत बदल का करण्यात आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत नागरिकांनी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार ठाकरे यांनी परिसरात धाव घेत पोलिस व मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सायंकाळपर्यंत प्रतिबंध हटविण्यात येतील, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र तसे न झाल्याने संतप्त नागरिक रस्त्यांवर आले, असे मत त्यांनी व्यक्त केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

Recent Comments