Home शहरं नागपूर Nagpur News: करोनामुळे अक्षय्यतृतीया ‘लॉक’ - carona causes akshay tritiya 'locked'

Nagpur News: करोनामुळे अक्षय्यतृतीया ‘लॉक’ – carona causes akshay tritiya ‘locked’


ना खरेदी-विक्री, ना उलाढाल

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

करोनारूपी महामारीमुळे सर्व धार्मिक सण-उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. त्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्यतृतीयादेखील अपवाद नाही. वैशाख महिन्यातील या तृतीयेला हिंदू धर्मीयांमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यादिवशी खरेदी केलेल्या वस्तूचा क्षय होत नाही, ती वृद्धिंगत होते, असादेखील समज आहे. त्यामुळे तृतीयेला सोने, वाहन, नवीन घराची खरेदी केली जाते. यंदा ही सर्व उलाढाल ठप्प आहे. त्याचा सराफा, ऑटोमोबाइल, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला फटका बसला आहे.

अक्षय्यतृतीयेला सोनेखरेदी मोठ्या प्रमाणात होते. ग्रॅमपासून ते तोळ्यापर्यंत सोनेखरेदी करण्यावर भर दिला जातो. परंतु, यंदाच्या अक्षय्यतृतीयेवर करोनाचे संकट ओढवले आहे. एरवी, दोन दिवस पूर्वीपासून सोन्याच्या खरेदीसाठी अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्यांच्या गर्दीने फुलणाऱ्या सराफा ओळमध्ये नीरव शांतता आहे. मिठाईची दुकानेदेखील बंद असल्याने यंदाचा हा सण घरातीलच गोडधोड पदार्थ करून साजरा करावा लागणार आहे. त्याशिवाय, ऑटोमोबाइल क्षेत्राला गुढीपाडवा आणि अक्षय्यतृतीया अशा दोन्ही शुभ मुहूर्तांवर खरेदी न झाल्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. हीच स्थिती रिअल इस्टेट आणि इलेक्ट्रॉनिक बाजाराची आहे. साधारणपणे शहरात अक्षय्यतृतीयेला विविध क्षेत्रातील मिळून किमान पन्नास ते साठ कोटींची उलाढाल होते. मागील काही वर्षांचा विचार करता यावेळी बहुदा पहिल्यांदाच कुठल्या तरी साथीमुळे उपराजधानीतील अक्षय्यतृतीया अक्षरश: ‘लॉक’ झालेली आहे.

दानधर्म लॉकडाउननंतर

‘अक्षय्यतृतीयेला प्रत्येकजण आपापल्या घरी पितरांची पूजा करीत असतो. यादिवशी ब्राह्मण वा गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेला, वाळा ठेवलेला घट दानस्वरूपात दिला जातो. सध्या आपात्कालीन स्थिती असल्याने आपल्या हातात काहीही नाही. अशावेळी दिवसापेक्षा भावना महत्त्वाची आहे. करोनामुळे एकमेकांच्या घरी जाणे बंद आहे. सुरक्षित वावर जोपासण्यात येत आहे. तेव्हा लॉकडाउन संपल्यानंतर पितरांच्या नावाने पाण्याने भरलेला घट आणि यथायोग्य दानधर्म करावा’, अशी माहिती महाराष्ट्रीय पंचांगकर्त्या विद्याताई राजंदेकर यांनी दिली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments