Home शहरं नागपूर Nagpur News : करोनावर गणितीय मॉडेल - mathematical model on corona

Nagpur News : करोनावर गणितीय मॉडेल – mathematical model on corona


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

करोना विषाणूवर जगभरात संशोधन होत असतानाच या विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गणित विभागातील प्रमुख डॉ. के. सी. देशमुख व अन्य दोन प्राध्यापकांनी गणितीय मॉडेल तयार केले आहे. त्यामुळे विषाणूंचा संसर्ग कमी करण्यात आणि करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढवण्यात मदत होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

करोनावर लस शोधून काढण्याचा प्रयत्न भारतासह देशभरात होतो आहे. गणिताच्या प्राध्यापकांनी एक गणितीय मॉडेल तयार करून या करोना विषाणूवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एसआयआरएम म्हणजेच संशयित, बाधित, करोनामुक्त आणि मृत्यू या चार मुद्यांवर आधारित मॉडेल तयार करण्यात आले. हे मॉडेल तयार करण्यात के. एच. देशमुख यांच्यासोबत एलआयटीचे प्राध्यापक एस. डी. वरभे आणि डॉ. नवनीत लांबा यांचा समावेश आहे.

करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला असून, त्याहून तीनपट लोकांना लागण झाली आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील आकडेवारीचा अभ्यास करण्यात येत आहे. लॉकडाउन, सुरक्षित वावर, आणि हवामान या तीन घटकांवर आधारित काही आकडेवारींचा अभ्यास करून काही ठोकताळे तयार करण्यात येत आहेत. यात देशातील राज्यांमधील करोनाबाधितांची संख्या, बरे झालेले रुग्ण व मृत्यूमुखी पडलेले रुग्ण यांचा प्रत्येक दिवसाआड आढावा घेण्यात येत असून त्यावर भविष्यात नेमकी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, लॉकडाउनचा नेमका काय परिणाम झाला, सुरक्षित वावरासह जिथे सार्वजनिक उपक्रम सुरू झालेत तिथे करोनाबाधितांची नेमकी किती संख्या वाढली, लॉकडाउन फायदेशीर ठरले काय, यासारख्या विविध मुद्यांवर ग्राफच्या माध्यमाने व गणितीय पद्धतीने निष्कर्ष समोर ठेवण्यात येत आहेत. त्यावर आधारित काही शिफारशी राज्य व केंद्र सरकारला करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. के. सी. देशमुख यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

…..



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik corona update: नाशिक जिल्ह्यात ५५८ करोनाबाधित – nashik district reported 558 new corona cases and 5 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, नाशिककरोना रुग्णसंख्येत दिवसाकाठी भरच पडत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ५५८ ही वाढती रुग्णसंख्या नोंदविण्यात आली, तर ३३० रुग्ण बरे होऊन घरी...

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: एनसीबीकडून आरोपपत्र दाखल, रिया आणि शौविकही आरोपी – ncb files chargesheet against 33, including rhea chakraborty sushant singh rajput drugs...

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तीस हजार पानांचं हे आरोपपत्र असल्याची माहिती समोर आली...

motorola moto g10: Moto G10 आणि Moto G30 ची लवकरच होणार भारतात एन्ट्री, कंपनीने शेयर केला टीजर – moto g10 and moto g30 india...

हायलाइट्स:मोटोरोला कंपनी दोन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच करणार Moto G10 आणि Moto G30 असे स्मार्टफोनचे नाव याआधी मोटोरोला कंपनीने या फोनला युरोपमध्ये...

Aurangabad Corona Update: Coronavirus : दोन मृत्यू, ३५७ नवे बाधित – aurangabad reported 357 new corona cases and 2 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहरातील शिवाजीनगर येथील ८३ वर्षीय, तर जालना जिल्ह्यातील तळणी येथील ६० वर्षीय, अशा दोन बाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू...

Recent Comments