Home शहरं नागपूर Nagpur News : करोना योद्धा पोलिसांसाठी २० लाख रुपये देणार - corona...

Nagpur News : करोना योद्धा पोलिसांसाठी २० लाख रुपये देणार – corona warrior will pay rs 20 lakh for the police


जिल्हाधिकाऱ्यांचे हायकोर्टात शपथपत्र

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

उपराजधानीतील पोलिसांना करोनापासून संरक्षण देण्यासाठी विविध सुरक्षा साधने खरेदी करण्यात येत आहेत. त्यासाठी २० लाख रुपयांचा निधी पोलिस आयुक्तांकडे जमा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात दिली आहे.

कायदा व सुव्यवस्थेसोबतच लॉकडाउनचे नियम लागू करण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या पोलिसांनाच करोनाची लागण होत असल्याने त्यांना आवश्यक त्या साधन सुविधा, त्यांची करोना तपासणी करण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका सिटीझन फॉर इक्वॅलिटीने हायकोर्टात सादर केली. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. याचिकाकर्त्यानुसार, पोलिसांना पुरेशा प्रमाणात मास्क, सॅनिटायजर, फेस शिल्ड, हॅण्डग्लोव्ह उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यावर हायकोर्टाने पोलिसांना कोणत्या साधनसुविधा उपलब्ध करायच्या त्यावर तज्ज्ञ समिती स्थापन करून त्यांच्या शिफारशीनुसार आवश्यक सोयीसुविधा व उपकरणे द्यावीत, असा आदेश दिला होता. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात करोनापासून पोलिसांचा बचाव करण्यासाठी सुरक्षा साधने खरेदी करण्यासाठी दहा लाखांचा निधी पोलिस आयुक्तांना देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा दहा लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अतिरिक्त दहा लाख रुपये आयुक्तालयाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातून फेस मास्क, सॅनिटायजर, हॅण्डग्लोव्ह इत्यादी साधने खरेदी करून त्याचे वाटप पोलिसांना करण्यात आले आहे, असे शपथपत्रात नमूद केले आहे.

डीपीसीमधून १ कोटी ६० लाख

मास्क, सॅनिटायजर व इतर साधने खरेदी करण्यासाठी सिव्हिल सर्जन कार्यालयाला डीपीसीतून ३० लाख, मेयोला १ कोटी ३४ लाख, तसेच राज्य आपत्ती निवारण निधीतून ५० लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sudhir mungantiwar: ‘एकनाथ शिंदे, तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता’ – eknath shinde has the potential to be chief minister says sudhir mungantiwar

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकाही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे चर्चेत आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पुन्हा नवे वक्तव्य करून...

Chloe Zhao: आशियाचा सन्मान : क्लोई जाओ – chloe zhao is becoming the first asian woman to ever win the prize for best director

'करुणा सर्व बंधने पार करते आणि मग तुमची वेदना माझी वेदना बनते...' गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांनी याच कार्यक्रमात व्यक्त...

Recent Comments