Home शहरं नागपूर Nagpur News : कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई - action against non-lending...

Nagpur News : कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई – action against non-lending banks


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात येईल आणि टोळधाडीच्या नुकसानासाठी सर्वेक्षणाचे आदेश दिले असून फवारणीसाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा घुसे यांनी दिली.

कृषिमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खरीप हंगामाचा आढावा घेतला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. विदर्भाच्या अनेक भागात टोळधाडीमुळे पिकांचे नुकसान झाले. सरकारने ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असून, शेतकऱ्यांना फवारणीसाठी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

कोणतीही बँक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नकार देऊ शकत नाही. कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात येईल. कुणीही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, याकडे लक्ष देण्यात आले आहे. या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे सांगून दादा भुसे म्हणाले, यंदा उत्पादकता वर्ष जाहीर केले आहे. त्यासाठी राज्य व देशातील पिकांच्या उत्पादकतेचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येत आहे. शेतमालाचे उत्पादन वाढवण्यावर सरकारने भर दिला असून, त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. बियाणे आणि खतांचा तुटवडा राहणार नाही. अधिक भावाने किंवा बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कापूस खरेदी करण्याची सूचना संबंधित यंत्रणांना केली असल्याचेही दादा भुसे यांनी सांगितले. पंतप्रधान शेतकरी योजनेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वर्धा जिल्हा व कर्जमुक्तीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा गौरव करण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले उपस्थित होते.

………

जीएम बियाणे वापरास परवानगी द्या

शेतकरी संघटनेची कृषिमंत्र्यांकडे मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

राज्यात जीएम व एचटीबीटी बियाणे वापरण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दादा भुसे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

जीएम बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असताना केंद्राने यावर बंदी आणली आहे. कापसाचे एचटीबीटी बियाणे राज्य वगळता सर्वत्र वापरण्यात येत आहे. हे वाण गुलाबी बोंडअळी प्रतिबंधक व उत्पादन खर्च कमी असल्याने त्याचा चोरून वापर होत आहे. यासाठी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात असून, त्यांची फसवणूकदेखील होण्याचा धोका असल्याकडे संघटनेचे नेते वामनराव चटप व राम नेवले यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.

जीएम व एचटीबीटी आरोग्य आणि पर्यावरण घातक नसल्याचे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी लोकसभेत स्पष्ट केले आहे. प्रकाश जावडेकर यांनीदेखील त्यास दुजोरा दिला. या बियाण्यांच्या प्रायोगिक तत्त्वावरील वापरासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही चटप यांनी केली.

जीएम बियाण्यांमुळे सोयाबीन व कापसासह इतर पिकांचे उत्पादन वाढले व खर्चही कमी झाला आहे. देशात मोठ्या प्रमाणात बियाण्यांची आयात होते. तंत्रज्ञान बंदीमुळे शेतमालाची निर्यात घटली आहे. खाद्यतेल व इतर पिकांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी जीएम बियाणे व तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळाल्यास शेतमाल उत्पादनात क्रांती होईल, असा दावा डॉ. सी.डी. मायी यांनी केला. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले. यावेळी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रमुख सतीश दाणी, तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख विजय नवल, मधुसूदन हरणे यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले.

……..Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Raghu: India vs Australia: भारतीय संघातील एक सदस्य झाला ‘गायब’? करोनाच्या चुकीच्या रिपोर्टमुळे झाला घोळ… – team india’s throw down specialist raghu’s corona test...

सिडनी, India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु झाला आहे. पण या दौऱ्यात भारतीय संघातील एक सदस्य अजूनही सरावाला आलेला...

Shahrukh Khan Snapped Near Gateway Of India In Mumbai – तो बघ शाहरुख! बदललेल्या लुकमुळे किंग खान बाजूने चालत गेल्याचंं कोणाला कळलंच नाही

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे चाहते तो मोठ्या स्क्रीनवर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलमध्ये त्याचा नवीन लुक समोर आल्यानंतर चाहते...

Vanchit Bahujan Aghadi: रेशनकार्डसाठी बायको द्या, तहसिलदारांसमोर युवकाचे अनोखे आंदोलन – vanchit bahujan aghadi protest for ration card in ahmednagar

अहमदनगर: सरकारी कार्यालयातून मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेकदा अनोखी आंदोलने केली जातात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तहसिदार कार्यालयासमोरही एका युवकाने असेच वेगळे आंदोलन केले....

Recent Comments