Home शहरं नागपूर Nagpur News : कारभारीण आहे घरी, नको दारूची होम डीलिव्हरी - the...

Nagpur News : कारभारीण आहे घरी, नको दारूची होम डीलिव्हरी – the steward is at home, not home delivery of alcohol


मद्यपींची भिस्त दुकांनातून खरेदीवर

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

करोनाविषयीची खबरदारी म्हणून शासनाने मद्याच्या होम डीलिव्हरीचे निर्देश दिले खरे. मात्र, अनेकांकडे कारभारीण अर्थात पत्नी लक्ष ठेवून असते. कारण, बरेच पतिराज प्रमाणात मद्यप्राशन करतात असे नाही. अशा मद्यपींची सध्या पंचाईत झाली आहे. अनेक दुकानांसमोरच ‘डीलिव्हरी’ची सोय होत असल्याने या मद्यपींचे फावले. मात्र, यामुळे सुरक्षित वावरचा फज्जा उडाला आहे.

वाठोडा, नंदनवन, गड्डीगोदामसह शहरातील अनेक भागांमधील दुकानांसमोर शनिवारीही मद्यपींची गर्दी दिसून आली. अनेक मद्यपींकडे दारू बाळगण्याचा परवाना नव्हता. त्यांनाही विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परवाना नसणाऱ्या ग्राहकांकडून एका बाटलीवर ५० रुपये अधिक घेण्यात आले. दुकानापासून काही अंतरावर थांबवून दुकानातील कर्मचारी त्यांना दारू देताना आढळले. असाच प्रकार शहरातील अन्य भागांतही दिसला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुकानदारांवर नियंत्रण नसल्याचे दिसून आले.

साहब, जमेगा तो आ जाओ…

‘मटा’ने शहरातील काही दुकानदारांना होम डीलिव्हरीबाबत संपर्क साधला. ‘साहब बहोत रश है. आप अपना नाम, लायसन्स नंबर, घर का पता व्हॉट्सअॅप करो, आज नही आया तो कल माल आप तक पहुंच जायेंगा, लेकीन भरोसे पे मत रहो, जमेगा तो दुकान के पास आ जायो’, असे उत्तर दुकानदाराने दिले.

घराजवळ आल्यास फोन कर…

दुकानदारांनी काही ग्राहकांना दुकानाजवळ बोलविले असले तरी काही ग्राहकांना मात्र होम डीलिव्हरी देण्यात आली. त्यातही अनेक ग्राहकांनी घरापासून ५० मीटर अंतरावरील पत्ता दिला. ‘घरी न येता दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्यास फोन कर’, अशी विनवणीही ग्राहकांनी दुकानदाराला केली. कर्मचारी दारू घेऊन दिलेल्या पत्त्यावर पोहोचताच ग्राहक तेथे गेले. पिशवी अथवा लुंगीत गुंडाळून घरातील ‘सुरक्षित ठिकाणी’ दारू लपवून ठेवली.

ऑनलाइन विक्रीच्या बहाण्याने गंडा

नागपूर : ऑनलाइन दारूविक्रीचा फायदा सायबर गुन्हेगारही घेत आहेत. ऑनलाइन दारू बोलविणाऱ्या दोन ग्राहकांना लिंक पाठवून त्यांच्या खात्यातून हजारो रुपये वळते करण्यात आल्याच्या दोन घटना उपराजधानीत घडल्या. याबाबतच्या तक्रारी गुन्हेशाखेच्या सायबर सेलकडे आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाजनगरमधील जगदीप आणि हनी या दोघांनी ऑनलाइन दारूखरेदीसाठी गूगलवर पीव्हीके वाइन शॉपचा संपर्क क्रमांक शोधला. या दोघांना ७५७७८९३९६१ व ९६२७९८३०६४ हे दोन मोबाइल क्रमांक आढळून आले. दोघांनी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सायबर गुन्हेगारांनी दोघांकडून बँक खात्यासह अन्य माहिती घेतली. दारू देण्यासाठी दोघांच्या मोबाइलवर लिंक पाठवली. दोघांनी लिंक उघडली. त्यानंतर काही वेळेतच दोघांच्याही बँक खात्यातून पैसे वळते झाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

grant to marathwada farmers: बारा लाख शेतकऱ्यांना ५५३ कोटी वाटप – 553 crore rupees of grant distributed to farmers in mrathwada

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली...

Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal 2021: गिरीश महाजनांनी गड राखला; ४५ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा – girish mahajan win in 45 seat gram panchayat elections

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांचीच सरशी झाली आहे. तालुक्यातील ६८ पैकी तब्बल...

Tesla Motors Will Route Its India Investment Through Dutch Arm – टेस्ला भारतात; पण एलन मस्क यांनी टाकला हा मोठा डाव | Maharashtra Times

मुंबई : अमेरिकन ऑटोमोबाइल कंपनी टेस्लाने भारतात येण्यासाठी नेदरलँडचा कर सवलतीचा मार्ग शोधला आहे. टेस्ला अॅम्स्टरडॅम ही टेस्ला मोटर्स अँड एनर्जी इंडियाची मुख्य...

Recent Comments