Home शहरं नागपूर Nagpur News : ‘केरळ मॉडेल’वर राज्य सरकारचे मौन - state government's silence...

Nagpur News : ‘केरळ मॉडेल’वर राज्य सरकारचे मौन – state government’s silence on ‘kerala model’


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

देशातील पहिला करोना रुग्ण केरळमध्ये आढळून आल्यानंतर तेथील राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे करोना नियंत्रणात आहेत. त्यामुळेच तेथील मॉडेलचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आला आहे. परंतु, केरळ व महाराष्ट्र या दोन राज्यांची भौगोलिक स्थिती भिन्न असल्याचे नमूद करीत राज्य सरकारने त्यावर भाष्य करण्याचे टाळले.

सुभाष झनवर यांनी नागपुरात वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता येथे केरळ मॉडेल अमलात आणावे, अशी विनंती करणारी याचिका हायकोर्टात सादर केली आहे. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता.

याचिकाकर्त्यानुसार, करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण केरळ येथे सर्वाधिक आहेत. त्या राज्यात दोन वर्षापूर्वी निपाह, सार्स, स्वाइन फ्लू यासारख्या करोनाच्याच गटातील विविध विषाणूंची बाधा नागरिकांना झाली होती. तेव्हा तेथील आरोग्य विभागाने गावपातळीवरील आरोग्यसेवा सक्षम केली होती. त्यामुळेच आता करोनावरही त्यांना मात करण्यात यश येत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक तपासणी व निदान केरळात होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन करोना स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. केरळने २८ दिवसांचे ‘होम क्वारंटाइन’ सक्तीचे केले आहे, तर देशात केवळ १४ दिवसांचेच ‘क्वारंटाइन’ आहे. याशिवाय नागरिकांसाठी टेलीमेडिसिन सेवा सुरू केली आहे. याशिवाय राज्यात १४०० पेक्षा अधिक ‘कम्युनिटी किचन’ तयार करण्यात आले आहेत. एका दिवसात ३०० डॉक्टर आणि ५०० हून अधिक पॅरामेडिकल स्टाफ नियुक्त करण्यात आला होता, असे विविध उपाय याचिकेत नमूद केले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने केरळ मॉडेलबाबत कोणतेही वक्तव्य करण्याचे टाळले. केरळ व महाराष्ट्र राज्यात भौगोलिक फरक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार केवळ केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचेच पालन करीत आहे तसेच त्यावरच राज्यात करोना रोखण्याच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे शपथत्रात नमूद केले आहे.

…………Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

West bengal: राष्ट्रीय आणि प्रादेशिक – editorial on the assembly elections in four states and one union territory

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये देशातली कोणतीही निवडणूक ही साऱ्या देशाचे राजकीय तापमान...

offsite atms: पुण्यात यापुढं फक्त बँकेच्या शाखेजवळच ATM सुविधा? – most of banks have decided to close offsite atm centres in pune

पुणे: बँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असणारी 'एटीएम' केंद्रे (ऑफसाइट एटीएम) बंद करण्याचा निर्णय बहुतांश बँकांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शॉपिंग...

Narendra Modi Took His First Dose Of Covid 19 Vaccine At Aiims Delhi – लसीकरणाचा दुसरा टप्पा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस...

हायलाइट्स:देशभरात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली लस६० वर्षांहून अधिक वयाच्या किंवा गंभीर आजारांशी झुंज देत असणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या...

Recent Comments