Home शहरं नागपूर Nagpur News : गडकरींच्या ‘अंगणा’त केदार, वडेट्टीवार ! - kedar, vadettiwar in...

Nagpur News : गडकरींच्या ‘अंगणा’त केदार, वडेट्टीवार ! – kedar, vadettiwar in gadkari’s ‘courtyard’!


शेतकऱ्यांशी आज संवाद

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

महाविकास आघाडी सरकारविरोधात राज्यातील भाजपने नुकतेच ‘माझे अंगण माझे रणांगण’ आंदोलन केले असतानाच केंद्रातील भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी काँग्रेसचे मंत्रिद्वय सुनील केदार व विजय वडेट्टीवार यांच्यासोबत आज, रविवारी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी १२ वाजता समाजमाध्यमाद्वारे हे नेते एकत्र येणार आहेत. गडकरींच्या ‘अंगणा’शी काँग्रेसचे मंत्री जोडले जाणार असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. तथापि, शेतकरी वर्गासाठी पक्षीय ‘रणांगण’ विसरल्याबद्दल अनेकांनी समाधानही व्यक्त केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लॉकडाउननंतर देशविदेशातील विविध घटकांशी समाजमाध्यमांतून संवाद साधणे सुरू केले. केंद्र व विविध राज्यांतील प्रश्न जाणून घेत त्यांनी ते सोडवण्यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करण्याची ग्वाही दिली. मात्र, या काळात त्यांनी राज्यातील कुठल्याही घडामोडींवर भाष्य करण्याचे टाळले. ही राजकारणाची वेळ नाही, सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असा सल्ला महिनाभरापूर्वी गडकरी यांनी दिला. या भूमिकेचा दस्तूरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका संवादात जाहीर उल्लेख करून गडकरींना धन्यवाद दिले. महिनाभरापूर्वी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती. नंतर झालेल्या बैठकीस मात्र महाविकासचे सर्व मंत्री व प्रमुख नेते उपस्थित होते हे विशेष.

राज्यातील सद्यस्थितीवरून भाजपने महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. यावरून संघर्ष सुरू झाला. भाजपने थेट आंदोलनाचे अस्त्र उपसले आणि शुक्रवारी सरकारच्या अपयशावरून राज्यभर निषेध केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सरकारविरुद्ध आवाज उठवण्यात आला असतानाच गडकरी कार्यालयाकडून रविवारी दुपारी १२ वाजता विदर्भातील शेतकऱ्यांशी संवाद होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यात त्यांच्यासोबत राज्यातील पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार आणि बहुजन विकास व आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार सहभागी होणार आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चा

पहिल्या युतीच्या काळात गडकरी यांच्यासोबत केदार राज्यमंत्री तर, वडेट्टीवार वनविकास महामंडळाचे अध्यक्ष होते. राज्यातील मंत्र्यांमध्ये संवाद नाही, अशी वारंवार टीका करणाऱ्या भाजपच्या राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने परंपरागत राजकीय शत्रू असलेल्या पक्षाच्या दोन मंत्र्यांना स्वतःच्या व्यासपीठावर बोलवण्यामागे नेमके समीकरण काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी संसदेत गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले होते, याकडे यासंदर्भात बोलताना एका नेत्याने लक्ष वेधले. पक्षीय चौकटीचा बाऊ न करता शेतकरी फोकस करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असल्याची प्रतिक्रियाही उमटली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

chhatrapati shivaji school satpur: उद्यान विभागाने बजावली नोटीस – park department issued notice to chhatrapati shivaji school over tree cutting

म. टा. वृत्तसेवा, सातपूरकामगारनगरी असलेल्या सातपूर कॉलनीतील विविध विकास संघटना संचलित छत्रपती शिवाजी विद्यालयात वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात आली होती. रविवारी (दि. २५) सुटीच्या...

Maratha reservation: वडेट्टीवार यांना मंत्रिमंडळातून हटवा – balasaheb sarate has demanded to removed vijay wadettiwar remove his minister post due to take stand against...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादविजय वडेट्टीवार यांच्या आक्षेपांना समर्पक उत्तर देण्यासाठी 'न्या. गायकवाड आयोगाची वैधानिकता' या विषयावर वडेट्टीवार यांच्याशी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून लाइव्ह चर्चा...

lucknow crime news: ‘तो’ मुलींसोबत करायचा अश्लील चॅटिंग; शेकडो मुलींकडून उकळले पैसे – uttar Pradesh Lucknow Police Arrested Man Who Chatting And Blackmail Girls...

हायलाइट्स:महिलांना ब्लॅकमेल करणारा तरूण अटकेतसोशल नेटवर्किंग साइटवर मुलींसोबत मारायचा अश्लील गप्पाचॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळायचालखनऊ पोलिसांच्या सायबर सेलने ठोकल्या बेड्यालखनऊ: सोशल...

Recent Comments